मुंबई : काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावर महाराष्ट्रासह राज्यात वातावरण तापलं आहे. डिझायनर असलेल्या अनिक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावरून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. यावरून ठाकरे गटावरही आरोप करण्यात येत आहेत. २०१५ साली अनिल जयसिंघानीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१४ साली शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्यावर अनिल जयसिंघानी २०१५ च्या आसपास फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. यावरून ठाकरे गटाला लक्ष्य केलं जात असल्याचं यावेळी आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) सांगितल.
Jayant Patil : देवस्थानच्या जमिनी लाटल्या जातात… सरकार बघ्याच्या भूमिकेत!
याबद्दल विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंना याना विचारलं. यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “हे सर्वांना माहिती आहे. ज्या जिल्ह्यात जयसिंघानी येतो, तेव्हा जिल्हाप्रमुख कोण होते ? पण मला याच्या खोलात जायचं नाही आहे. कारण, याच्यात सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाच्या घरात जाऊ शकतात, हे खूप गंभीर असल्याचे यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितल.