Aditya Thackeray on Eknath Shinde : गुजरात सरकारने आज मुंबईत व्हायब्रंट गुजरात (Vibrant Gujarat) या कार्यक्रमाचं आयोज केलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हे या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 रोड शो चं नेतृत्व करणार आहे. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत, यासाठी त्यांचा व्हायब्रंट गुजरात रोड शोचे आयोजन केलं आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) स्वत: या कार्यक्रमला उपस्थित असणार आहेत. यावरून उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली.
Israel-Hamas: हमास कमांडरने इस्रायलवर कसा रचला हल्ल्याचा कट, वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे हे सत्तेत आल्यानंतर राज्यातील अनेक प्रकल्प अन्य राज्यात गेले, वेदांत फॉक्सकॉन, एअर बस प्रकल्प, सोलर एनर्जी पार्क, बल्क ड्रग पार्क असे मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवण्यात आले. याचाच संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले आहे. आदित्य ठाकरेंनी ट्वीट करत लिहिलं की, गुजरातचे मुख्यमंत्री आज मुंबईत आहेत. ‘व्हायब्रंट गुजरात’ रोड शोसाठी. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत, यासाठी हा खटाटोप. पण, त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर त्यांनी आनंदाने कोलांड्या उड्या मारत इकडचे उद्योग तिथे पाठवायच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला असता, असा टोला त्यांनी लगावला.
त्यांनी लिहिलं की, वेदांत फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस-टाटा, 40 गद्दार… सगळंच तर पाठवलं तिथे… अजून काय पाहिजे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ कार्यक्रम मात्र, होऊ नाही शकला. कारण, ह्या खोके सरकारचं मॅग्नेट स्वत:साठी खोके खेचतंय आणि उद्योग-रोजगार तिथं पाठवंत! गुजरातल पाठवतात रोजगार आणि मिंधे सरकार रोज गार, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.
खासदार संजय राऊत यांनीही या कार्यक्रमावरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. एकनाथ शिंदे हे व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमाला जाणार हाच अंगार आणि भंगारमधला फरक आहे, अशी टीका त्यांनी केली होती.
दरम्यान, ठाकरे गटाने केलेल्या या टीकेला आता शिंदे गट काय प्रत्युत्तर देत हेच पाहणं महत्वाचं आहे.