मंत्री सत्तार बरळले…‘कुत्रा’ चिन्हावर लढलो, तरी निवडून येईल

MInister Abdul Sattar : आपल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शिंदे गटाचे आमदार तसेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. नुकतेच त्यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उडाली आहे. आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाईबाबत कोर्टात अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यातच सत्तार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत भाष्य करत म्हंटले की, मी स्वतः निवडणुकीला […]

Untitled Design (99)

Untitled Design (99)

MInister Abdul Sattar : आपल्या विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शिंदे गटाचे आमदार तसेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा वादात सापडले आहे. नुकतेच त्यांनी केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर पुन्हा टीकेची झोड उडाली आहे. आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाईबाबत कोर्टात अद्याप निर्णय प्रलंबित आहे. यातच सत्तार यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत भाष्य करत म्हंटले की, मी स्वतः निवडणुकीला कुत्रा या चिन्हावर लढलो तरी निवडून येईल. दरम्यान यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे.

शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यातच शिंदे गटासोबत गेलेले व सरकारमध्ये मंत्रीपदी असलेले अब्दुल सत्तार हे नेहमी आपल्या वक्तव्याने टीकेची धनी बनतात. यातच त्यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधानं केले आहे.

सत्तार हे राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर बोलत होते. सत्तासंघर्षाचा निकाल कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान हा निकाल काय असणार आहे याकडे राजकीय वर्तुळासह देशातील जनतेचे लक्ष लागून आहे. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये बोलताना अब्दुल सत्तार यांनी 16 आमदार अपात्रतेच्या संदर्भात मोठं वक्तव्य केले आहे.

सत्तार म्हणाले, आता आमचे कॅप्टनच गेले तर बाकी काही बघण्याचा प्रश्नच नसतो, त्या सोळा आमदारांमध्ये मी देखील आहे. राजकारणात प्लॅन A , प्लॅन B असतो, प्लॅन प्रमाणेच घडते असं काही नाही. मात्र आम्ही सत्तेतून जरी गेलो तरी इतिहास राहणार अन् आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार. आमचे पन्ने इतिहासात लिहिले जाणार. कोर्ट जो काही निर्णय देईल तो निर्णय देशासाठी लागू होईल. सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्ही मान्य करू असेही सत्तार म्हणाले.

पुढे बोलताना सत्तार म्हणाले, मला काही निकालाचे टेन्शन नाही, आपली लोकल गाडी आहे. हात दाखवा आणि गाडी थांबवा. मी कुत्रा निशाणी वर लढलो तरी सत्तार आमदार पक्का आहे असे वक्तव्य कृषीमंत्री सत्तार यांनी केले आहे. अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीही चिन्हावरुन असं वक्तव्य केले होते.

दरम्यान राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतांना 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा महत्वाचा मानला जात आहे. त्यामध्ये स्वतः अब्दुल सत्तार हे देखील आहे. त्यामुळे आगामी काळात मी कुत्रा निशाणीवर जरी लढलो तरी निवडून येईल म्हणत सत्तार यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Exit mobile version