Download App

ABP C Voter Survey : शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार? सर्वेक्षणात ‘या’ नावाला पसंती

ABP C Voter Survey On NCP Chief : राष्ट्रवादीचे (NCP)सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा (resignation)दिल्यानंतर काय होणार? हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासह (Maharashtra)देशाच्या राजकारणातही (politics)कायम आहे. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करताच सर्वांनाच धक्का बसला आहे. येत्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका (Mumbai Municipal Corporation Election)होणार असून 2024 मध्ये विधानसभा (Assembly Election), लोकसभा (Lok Sabha Elections)होणार आहे, अशावेळी पवारांनी ही घोषणा केली.

पहाटे 4 वाजता चहा-नाश्त्याच्या 50 ऑर्डर, मुंबई पोलिसांनी पकडले बनावट कॉल सेंटर रॅकेट

देशाच्या राजकारणात मोठा दबदबा असलेल्या शरद पवार यांच्या या निर्णयावरुन अनेक अर्थही काढले जात आहेत. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र ते पटले नाही तर राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? याचे उत्तर सर्वांनाच जाणून घ्यायचं आहे.

राजकीय वातावरण तापलेलं असताना सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणी व्हावं, असा प्रश्न लोकांना विचारला होता. या प्रश्नाला लोकांनी अनेक उत्तरं दिली आहेत. यामध्ये,
अजित पवार – 34 टक्के
सुप्रिया सुळे – 31 टक्के
दोन्हीही – 26 टक्के
माहित नाही – 9 टक्के

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनाच जनतेची पहिली पसंती असल्याचे सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे असून सध्या ते महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचे मोठे स्थान आहे. ते चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत.

त्याचवेळी 31 टक्के लोकांनी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्का मारला आहे. सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या असून त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या खासदार आहेत.

Tags

follow us