Download App

22 तारखेला हजर व्हा, राजन साळवींना पुन्हा नोटीस; म्हणाले, ‘अटक झाली तर…’

  • Written By: Last Updated:

Rajan Salvi PC : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्या घरावर काल अँटी करप्शन ब्यूरोने (Anti Corruption Bureau) धाड टाकली. तब्बल आठ तास त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज पुन्हा एकदा अँटी करप्शन ब्यूरोने त्यांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान, साळवी यांनी अँटी करप्शन ब्यूरोच्या कारवाईवर भाष्य केलं. अँटी करप्शन ब्यूरोने आता माझ्या भावालाही चौकशीसाठी बोलवलं आहे. त्यामुळं हा कुटुंबाला त्रास देण्याचा प्रकार आहे, असा आरोप करत ही अटकेपूर्वीची तयारी आहे, असं साळवी म्हणाले.

मुंबईला एकजुटीने धडक द्यायची; आरक्षण मिळवूनच माघारी फिरणार, जरांगेंचा ठाम निर्धार 

राजन साळवी हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-राजापूर मतदारसंघातील ठाकरे गटाचे आमदार आहेत. काल सकाळी एसीबीने त्यांच्या निवासस्थानावर छापे टाकले. यानंतर साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपविभागीय अधिकारी सुशांत चव्हाण यांनी साळवींना पुन्हा नोटीस बजावली आहे. याबाबत बोलतांना साळवी म्हणाले की, काल सकाळी नऊ वाजता एसबीच्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी संबंधित मालमत्तांची चौकशी करून आपला अहवाल तयार केला. त्यानंतर जातांना ते म्हणाले आजच्या दिवसापुरती चौकशी पूर्ण झाली. या चौकशीचा तपास वरिष्ठांकडे देऊन त्यांच्या निर्देशानुसार कारवाई करू. त्यानंतर आज सकाळी ते अटक करायला येतील, असं मला वाटलं. मात्र, त्यांनी आज नोटीस दिली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सुशांत चव्हाण यांनी ही नोटीस दिली. आता त्यांनी आपला मोर्चा माझ्या भावाकडे वळलवा. त्यामुळं सोमवारी तुमच्या बंधूसह हजर राहा, असं बजावलं. हा सर्व कुटुंबाला ते वेठीस धरण्याचा प्रकार आहे, असं साळवी म्हणाले.

Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शेअर बाजारच्या वेळेतही बदल, दुपारनंतर सुरू होणार बाजार 

ते म्हमाले, मी सोमवारी रत्नागिरी एसीबी कार्यालयात हजर राहणार आहे. यावेळी मी आणि माझा भाऊ दोघेही हजर राहणार आहोत. याआधीही माझी सहावेळा चौकशी झाली. तेव्हा माझी, माझ्या पत्नीची, पीएची, भाऊ दिपक साळवी, पुतण्या, बहीण या सर्वांची चौकशी झाली. या सर्वांची माहिती एसीबी कार्यालयाकडे केव्हाच दिली आहे. कुटुंबाला त्रास देणे हा त्यांचा अजेंडा दिसतोय. आतापर्यंत माझ्याशी संबंधित 70 जणांना नोटिसा मिळाल्या आहेत, असं साळवी म्हणाले.

माझ्याकडे साडेतीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता आहे, असे म्हणणाऱ्या एसबीला न्यायालयात उत्तर द्यावं लागणार आहे. मला अटक झाली तरी मी, माझा मुलगा आणि पत्नी त्याला सामोरे जाण्यास तयार आहोत, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल, असंही साळवी म्हणाले.

दरम्यान, गुरुवारी गुन्हा दाखल झाल्याने 22 जानेवारीची कारवाई ही अटकेपूर्वीची तयारी असावी असा संशय साळवी यांनी व्यक्त केला.

follow us