Congress MLA : विधान परिषद निवडणुकीत चांगलाच घोडेबाजार पाहायला मिळाला. (Congress ) मागच्या निवडणुकीसारखंच यावेळीही काँग्रेस पक्षाचे ७ आमदार फुटल्याची माहिती आहे. (MLC) त्यात विदर्भातील १ मराठवाडातील ३ आमदार, उत्तर महाराष्ट्रातील २ आमदार तर एक मुंबईतील १ आमदार फुटला असल्याची सूत्रांची माहिती आहे.
आता उमेदवारी नाही शेतकऱ्यांची लूट थांबवा, दुधाचे दर वाढवू द्या अन् कर्जमाफी करा; नाना पटोलेंची मागणी
या आमदारांवर काँग्रेस हाय कमांड लवकरच कारवाई करणार असल्याची माहती प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. याबाबतचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीत जाऊन हाय कमांडकडे देणार असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तसंच, या फुटलेल्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट न देण्याची शिफारसही नाना पटोले करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहेत फुटलेले आमदार
काँग्रेस कारवाई करणार
काँग्रेसची जवळपास सात मतं फुटल्याच्या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मतं फुटल्याची कबुलीच महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसकडून दिल्लीला अहवाल पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल या आमदारांवर कारवाई करण्याची शिफारस महाराष्ट्र काँग्रेसने अहवालात केल्याचं कळतय.
आठ मत फुटल्याचा अंदाज भाजपने विणलेलं भीतीचं अन् संभ्रमाचं जाळं तुटलं; पोटनिवडणुकांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट
विधान परिषदेच्या ११ जागांवर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पुरस्कृत उमेदवार, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीकडे पुरसे संख्याबळ असतानाही त्यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीतील आमदारांची मतं फुटल्याचं स्पष्ट झालं आहे. यावरून आघाडीत दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या जवळपास आठ आमदारांची मतं फुटल्याचं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.