भाजपने विणलेलं भीतीचं अन् संभ्रमाचं जाळं तुटलं; पोटनिवडणुकांच्या विजयानंतर राहुल गांधींचं ट्विट
Rahul Gandhi : इंडिया आघाडीच्या उमेदवारांनी सात राज्यांतील 13 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत बाजी मारली आहे. 13 जागांपैकी 10 जागा इंडिया आघाडीने जिकल्या आहेत. तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला फक्त दोन जागा जिंकता आल्या. (BJP) याशिवाय एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली आहे. (Rahul Gandhi ) दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदान हल्लाबोल केलंया.
पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधी यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. आपल्या ट्विटरवरील पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, 7 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांनी भाजपने विणलेलं भीतीचे आणि संभ्रमाचं जाळं तुटल्याचं स्पष्ट झालं आहे. शेतकरी, युवक, मजूर, व्यापारी, नोकरदार अशा प्रत्येक वर्गाला हुकूमशाही पूर्णपणे नष्ट करून न्यायाचं राज्य प्रस्थापित करायचं आहे. लोक आता त्यांचं जीवन सुधारण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी पूर्णपणे इंडियासोबत उभे आहेत. जय हिंदुस्थान, जय संविधान अशा शब्दांत राहुल गांधींनी ट्वीट केलं आहे.
पश्चिम बंगालमधील चार जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या विजयाने ममता बॅनर्जी यानीही प्रतिक्रिया दिली आहे. अनेक कट रचले गेले. एका बाजूला केंद्रीय यंत्रणा, तर दुसरीकडे भाजप. या प्रकारची हुकूमशाही थांबवायची आहे. याच संपूर्ण श्रेय सामान्य नागरिकांना जातं अशा शब्दांत त्यांनी भाजपवर घणाघात केलाय.
विधान परिषद निवडणुकीतील गद्दारी महागात पडणार; फुटलेल्या काँग्रेस आमदारांची नावं आली समोर
द्रमुकचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनीही इंडिया आघाडीच्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले आहेत की, ”भाजपने पराभवातून धडा घेतला पाहिजे. प्रादेशिक भावनांचा आदर केल्याशिवाय भाजप सरकार आणि पक्ष चालवू शकत नाही, हे भाजपने समजून घेतले पाहिजे असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.