Download App

पक्षात फुट, आवडता नेता अन् सध्याचं राजकारण; मकरंद अनासपुरेंकडून चिरफाड

Image Credit: Letsupp

Makarand Anaspure News : देशासह राज्यात लोकसभेची रणधुमाळी सुरु आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात पक्षात फुट पडून अनेक राजकीय मंडळी सत्तेत सामिल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. अशातच आता लोकसभा निवडणुका (Loksabha Election) लागल्याने सर्वच नेत्यांची धामधूम सुरु आहे. सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर मराठी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी भाष्य करीत चिरफाडच केली असल्याचं दिसून आलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनासपुरे पक्षाची फुट, आवडता नेता ते सध्या सुरु असलेल्या राजकारणावर स्पष्टपणे बोलले आहेत.

शिर्डी लोकसभेचं गणित बदलणार?, दादा भुसेंची आणि माजी आमदार भानदास मुरकुटेंची बंद दाराआड चर्चा

मकरंद अनासपुरे म्हणाले, पक्षात फुट पडणे ही मतदारांची फसवणूकच आहे. निवडणुकीदरम्यान, मतदाराने मत दिलेलं असत त्यानंतर राजकीय नेत्याने कोलांटीउडी मारली की मतदारांचा अपेक्षाभंग होतो. त्यामुळेच आता मतदारांनी सजग होणं गरजेचं आहे. आपल्या वर्तमान आणि भविष्य काळाचा अभ्यास करुन उपयुक्त उमेदवार निवडून देणं ही काळाची गरज आहे, अन्यथा आपलंच नुकसान होणार असल्याचं मकरंद अनासपुरेंनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी बोलताना मकरंद अनासपुरेंनी आपला आवडता नेत्याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपचे नेते नितीन गडकरी यांना आवडता नेता म्हणून पसंती दिली आहे. तर शरद पवार आणि ठाकरे घराणे आता एकत्र आल्याने उजवा डाव्याचा प्रश्नच राहिलेला नाही. त्यामुळे दोन्ही घराण्यांच्या बाजूने मी असल्याचं मकरंद अनासपुरेंनी स्पष्ट केलं आहे.

एकनाथ खडसेंना छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत गुन्हा दाखल

नाना पाटेकरांचा राजकारणाचा पिंड नाहीच…
मागील काही दिवसांपासून अभिनेते नाना पाटेकर राजकारणात येण्याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. अखेर नाना पटोले यांनी राजकारणात येणार नसल्याचं सांगितलं असल्याचं बोललं जात आहे. त्यावर बोलताना अनासपुरे म्हणाले, नाना पटोले यांचा राजकारणाचा पिंड नाही, त्यांनीही याबाबत सांगितलं आहे. राजकारणात बोलणारे खूप नेते असल्याचं मकरंद अनासपुरे म्हणाले आहेत.

‘अबबबो…राजकारण्यांच्या सल्ल्याने आम्हीच परेशान’
सध्याचं राजकारण जे सुरु आहे त्यावरही मकरंद अनासपुरे यांना या मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्यावर अनासपुरेंनी आपल्या खास शैलीत परखडपणे मत व्यक्त केलं आहे. मकरंद अनासपुरे म्हणाले, अबबबो…. आत्ताच्या राजकारण्यांचे सल्ले घेऊन आम्हीच खूप परेशान आहोत, त्यांना आम्ही काय सल्ले देणार या शब्दांत त्यांनी उत्तर दिलं आहे.

मी मुख्यमंत्री झाल्यास…
मी राजकारणात आलो अन् पक्ष सुरु केला की त्याचं नाव ‘मप’ म्हणजेच मकरंद अनासपुरे असं माझ्या पक्षाचं नाव असणार असल्याचं अनासपुरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच मी मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांवरील अन्याय करणारे कायदे रद्द करणार आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या गोष्टी पूर्ण करेन. पहिल्याच दिवशी हा आयोग लागू करुन शेतकऱ्यांच्याविरोधातील कायदे रद्द करणार असल्याचं अनासपुरेंनी सांगितलं आहे.

follow us

वेब स्टोरीज