एकनाथ खडसेंना छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत गुन्हा दाखल

एकनाथ खडसेंना छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत गुन्हा दाखल

Eknath Khadse : भाजपमध्ये पुन्हा वापसी करण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसे यांच्याबाबत (Eknath Khadse) मोठी बातमी समोर आली आहे. खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांच्या घरी धमकीचा फोन आला होता. हा फोन कुणी केला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ खडसेंना वेगवेगळ्या मोबाइल नंबरवरून धमकीचे फोन आले आहेत.

Eknath Khadase यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नलची गरज नाही, आमचा दुपट्टा तयार; बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

एकनाथ खडसेंना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. हे फोन विविध देशांतून येत आहेत. नुकताच आलेला धमकीचा फोन अमेरिकेतून केला होता. धमकी कशासाठी देण्यात येत आहे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. त्यांच्याकडून तपास केला जात आहे. परंतु धमकीचा फोन दाऊद छोटा शकील गँगकडून आल्याचे सांगण्यात येत आहे.

परवापासून काल रात्रीपर्यंत मला धमकीचे फोन आले. आम्ही तुम्हाला मारू, तुमचा जीव घेऊ अशी धमकी फोनवरून देण्यात आली. फोन कोणत्या नंबरवरून आला याचा ट्रेस केल्यानंतर एक अमेरिका आणि एक फोन उत्तर प्रदेशातील होता असे खडसे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. या प्रकाराने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजकारणी नेत्यांना धमकी देण्याचे प्रकार अजूनही सुरू आहेत.

घरवापसीपूर्वीच एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? चंद्रकांत पाटलांची हायकोर्टात धाव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube