Archana Gautam : बिग बॉस फेम अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हीला नुकत्याच एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या (Congress) लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या अर्चना गौतम हिला काँग्रेसच्याच कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कार्यालयाबाहेर असलेल्या त्यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ केली आणि तेथून हुसकावून लावले, असा आरोप अभिनेत्रीने केला आहे. हे सगळं करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते होते असेही तिने सांगितले.
अर्चना गौतम तिच्या वडिलांसह काल काँग्रेस कार्यालयात आली होती. पण, येथे काही वेगळेच घडले. त्यांनी कार्यालयात जाण्याच प्रयत्न केला. पण, त्यांना आत जाऊ दिले नाही. तिथे उपस्थित असलेल्या काही महिलांनी धक्काबुक्की केली. मारहाणही केली. महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill ) मंजूर झाल्याने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचे अभिनंदन करण्यासाठी अर्चना येथे आली होती. परंतु, तिच्यासह तिच्या वडिलांना काँग्रेस कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला, असे तिने प्रसारमाध्यमांना सांगितले.
अफगाणने दिल्लीतील दूतावासाचा गाशा गुंडाळला, राजदूताने भारत सोडला
मी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात जात असताना आम्हाला अडविण्यात आले. त्यानतंर मला काही जणांनी धक्काबु्क्की केली. शिवीगाळ करून कार्यालयाबाहेर हुसकावण्यात आलं. माझ्या वडिलांनी मला सावरलं त्यानंतर आम्ही तेथून निघून गेलो. या प्रकारानंतर आता मी मात्र शांत बसणार नाही. माझ्यासारख्या अभिनेत्रीबरोबर काँग्रेस पक्ष अशी वागणूक करत असेल तर इतरांचं काय असा सवाल तिने उपस्थित केला. माझ्यासोबत जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं
यानंतर आता एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकाराबद्दल अर्चनाचे वडील मेरठ पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे समजते. या प्रकारावर अर्चना गौतम स्वतः पत्रकार परिषद घेणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. यानंतर आता अभिनेत्री अर्चना गौतम काय भूमिक घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ISKCON वर केलेले आरोप मनेका गांधींना भोवणार? इस्कॉनकडून 100 कोटींचा दावा…