अफगाणने दिल्लीतील दूतावासाचा गाशा गुंडाळला, राजदूताने भारत सोडला
Afghanistan Embassy : अफगाणिस्तानने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने भारतातील दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानचा हा दूतावास भारताची राजधानी दिल्लीत आहे. आता बंद करण्यात येत आहे.अफगाणिस्तानकडून भारताच्या परराष्ट्र मंत्रालयालाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयालाही एका पत्राद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. अफगाणिस्तानचा हा निर्णय काही प्रमाणात आश्चर्यकारक आहे कारण तालिबान सत्तेवर येऊनही अफगाणिस्तानचे भारतासोबतचे संबंध बिघडले नाहीत. अशा स्थितीत या निर्णयामागे काही कारण आहे का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. दिल्लीतील अफगाण दूतावास बंद करण्याच्या चर्चेची सत्यता भारताकडून तपासली जात आहे.
Afghan embassy in India has purportedly come out with communication on closing down its operations and New Delhi is examining its authenticity: Sources
— Press Trust of India (@PTI_News) September 28, 2023
अफगाणिस्तानचा दूतावास बंद करण्याचे कारण काय?
अफगाणिस्तान किंवा भारताकडून याबाबत कोणतीही माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पुरेशी मदत न मिळाल्याने अफगाणिस्तानने दिल्लीतील आपला दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंदझाई, ज्यांची नियुक्ती अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी तालिबानच्या आधी केली होती.
अमेरिकेत जाऊन परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रुडोंना सुनावले, ‘कॅनडा भारतविरोधी कारवायांचे केंद्र’
अशा स्थितीत भारतातील दूतावासालाही अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारकडून मदत मिळत नाही. याशिवाय अफगाणिस्तान सरकारकडूनही दूतावासावर दबाव आणला जातो. या कारणास्तव फरीद मामुंदझाई यांनी पत्र लिहून दिल्लीतील दूतावासातील कामकाज बंद ठेवल्याची माहिती दिली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहाव्या दिवशी पदकांची लयलूट; नेमबाजीत 5 पदके, टेनिसमध्ये रौप्य
राजदूत देश सोडून गेले
वृत्तानुसार, अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाई भारत सोडून गेले आहेत. अफगाणिस्तानचे राजदूत भारतीय दूतावासातील काम थांबवून परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत माहिती दिल्यानंतर लंडनला गेले आहेत.