Download App

शिंदेंचा आमदाराच्या अडचणी वाढल्या, अभिनेत्रीने थेट पोलीस ठाणं गाठलं; धक्कादायक प्रकरण समोर

Actress File Case Against Shiv Sena MLA Mahendra Thorve : रायगडमधून (Raigad) एक मोठी बातमी समोर येतेय. शिंदेसेनेच्या (Shiv Sena MLA) एका आमदाराच्या अडचणी वाढल्याची माहिती मिळतेय. रायगडमधील कर्जतचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अभिनेत्रीने तक्रार दाखल केलीय. थोरवे यांनी भूखंड लाटण्यासाठी गुंडगिरीचा वापर केलाय, असा आरोप अभिनेत्री हेमांगी राव (Hemangi Rao) यांनी पत्रकार परिषद घेत केलाय.

‘या’ दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या आहेत. अभिनेत्री हेमांगी राव मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री आणि सह अभिनेत्री म्हणून भूमिका साकारतात. त्यांनी कर्जतचे आमदार (Shiv Sena MLA Mahendra Thorve) आणि नवी मुंबईतील एका व्यावसायिकाविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केलीय. भूखंड लाटण्यासाठी धमकावलं, असा आरोप त्यांनी या आमदारावर केलाय.

याप्रकरणाची चर्चा आता संपूर्ण रायगडमध्ये रंगली आहे. अभिनेत्री हेमांगी राव आणि तिचे पती डॉक्टक विनोद राव यांची मुंबई- पुणे जुना महामार्गालगत जमीन आहे. ही जमीन खालापूर तालु्क्यातील कांडरोली गावाच्या हद्दीमध्ये आहेत. तर या जमिनीचा व्यवहार नवी मुंबईतील व्यावसायिक विकासक दिपक वाधवा यांनी केला होता. परंतु काही कारणांमुळे तो व्यवहार पूर्ण झाला नाही. परंतु, तरीही वाधवा ही जमीन बळजबरीने दादागिरीचा वापर करत हस्तगत करतोय, असा आरोप राव कुटुंबाने केलाय.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघात ‘राडा’, कोच गंभीर इंग्लंडला जाणार नाही, कारण काय?

जमिन बळकावण्यासाठी वाधवा यांना आमदार महेंद्र थोरवे मदत करत आहेत. ते आम्हाला धमकावत देखील आहेत, असा आरोप अभिनेत्री हेमांगी रावने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रार अर्जामध्ये केलाय. पत्रकार परिषदेमध्ये अभिनेत्रीने अनेक गंभीर आरोप देखील केलेत. चारवेळा पोलिसांत तक्रार करुनही देखील पोलीस दखल घेत नाही, असा आरोप राव कुटुंबाने केलाय. याप्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच तक्रार केलीय, असं अभिनेत्री हेमांगी रावने सांगितलं आहे.

 

follow us