Download App

‘लुटमार, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा..,’; Aaditya Thackeray यांचा राज्य सरकारवर निशाणा

Aaditya Thackeray : लुटमारीचे, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील उद्योगांची, बेरोजगारांच्या स्थितीवर भाष्य करीत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भातील ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले, “उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व असलेलं महाविकास आघाडीचं सरकारच महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करत होतं ह्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं! प्रफुल्ल सारडा जी ह्यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होतंय की भाजपच्या फडणवीस सरकारपेक्षा उद्धवसाहेब ठाकरेंच्या नेतृत्वातील मविआ सरकारच सरस होते! फडणवीस सरकारच्या च्या ६० महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या लघु व सुक्ष्म उद्योगांची स्थिती बिकट होती. पण आमचं मविआ चं सरकार येताच, अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत ह्याच उद्योगांमध्ये भरघोस अशी ३५% नी वाढ झाली. रोजगाराच्या संधीमध्येही ४२% नी वाढ झाली.

Prajakta Koliनं चाहत्यांना दिली गुडन्यूज; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिला आश्चर्याचा धक्का

आणि हे सगळं गद्दारी करून सरकार पडण्याआधी केवळ ३० महिन्यांच्या कालावधीत, कोरोना संकटाच्या काळात करुन दाखवलं! महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारं सरकार जर गद्दारी करून पाडलं गेलं नसतं, तर महाराष्ट्राची कितीतरी पट भरभराट इतक्यात झाली असती. उद्धवसाहेबांची दूरदृष्टी, नैपुण्य आणि मविआतील सर्वच सहकाऱ्यांची साथ ह्या जोरावर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आले असते. पण आत्ताचे हे लुटमारीचे, गद्दारीचे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा मविआ सरकार येईल, कारण महाराष्ट्राच्या जनतेला पक्कं ठाऊक आहे, महाराष्ट्रप्रेमी कोण आहे आणि महाराष्ट्रद्रोही कोण आहे!” असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप-शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये जोरदार टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे गटावर टीकेची तोफ डागत आहेत, त्यावर प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारच्या उद्योग आणि बेरोजगारीच्या धोरणांवर आक्षेप घेत आहेत.

Tags

follow us