आदित्य ठाकरेंनी घेतली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची भेट

चेन्नई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Chief Minister MK Stalin) यांची भेट आज घेतली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी श्री करुणानिधी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची स्मृती एमके स्टॅलिन यांना भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंनी स्टॅलिन यांच्या कामाची स्तुति […]

Untitled Design (3)

Untitled Design (3)

चेन्नई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (Chief Minister MK Stalin) यांची भेट आज घेतली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

यावेळी श्री करुणानिधी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीची स्मृती एमके स्टॅलिन यांना भेट दिली. यावेळी आदित्य ठाकरेंनी स्टॅलिन यांच्या कामाची स्तुति केली. तामिळनाडू राज्य शाश्वत विकास, पर्यावरण आणि हवामान कृतींमध्ये मोठी प्रगती करत आहे. त्यामुळे तामिळनाडू राज्याचा चांगला विकास होत आहे, अशा शब्दात  आदित्य ठाकरे यांनी या भेटीदरम्यान कौतुक केले.

https://www.youtube.com/watch?v=gXMghA2XkpQ

यावेळी शिवसेना नेते अनिल देसाई, तामिळनाडूचे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री, उदयनिधी स्टॅलिन, माजी खासदार टी.के.एस. एलांगोवन बैठकीला उपस्थित होते.

प्राजक्त तनपुरे यांनी सांगितला मंत्रिपदाचा किस्सा 

Exit mobile version