Download App

दिल्लीसमोर लोटांगण घालायचे काम, आदित्य ठाकरेंचा महायुती सरकारवर निशाणा

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेकडून होत असलेल्या टीकेला आता आमदार आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) जोरदार टीकी केली आहे. राज्यातील घटनाबाह्य सरकार फक्त दिल्लीसमोर लोटांगण घालायचं काम करतेय, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

‘घातक’चे दिग्दर्शक राजकुमार संतोषींना 2 वर्षाचा तुरुंगवास, ‘या’ प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा

आज लालबाग येथे ठाकरे गटाची महा निष्ठा, महा न्याय सभा झाली. या सभेत बोलताना आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकार आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं. ते म्हणाले, भाजपप्रणित राज्यांत अस्थिरता तयार झाली. लोकांना आंदोलने करावी लागत आहे. आणि ही आंदोलन चिरडून टाकली जात आहेत. आज धर्माधर्मात वाद दिसतो. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतच्या राज्यात संघर्ष आहे. लडाखमध्ये राज्य परत मिळवण्यासाठी लोक संघर्ष करत आहेत. लडाखवर सरकारचं लक्ष नाही. शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये, यासाठी दिल्लीच्या सीमा सील केल्या जात आहेत. देशाच्या बॉर्डवर जसे खिळे लावले जातात, तसेच दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी खिळे लावले जात आहे. दिल्लीच्या सीमेवर सैन्य तैनात करण्यात आलं. तिकडे लडाखमध्ये चीन घसतोय, तिथं सरकार काही करत नाही. मात्र, सैनिकी बळाचा वापर सरकार शेतकऱ्यांवर करतेय, अशी टीका ठाकरेंनी केलं.

इंदिरा गांधींचा तिसरा मुलगा काँग्रेस सोडेल? कमलनाथांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पक्षाने फेटाळल्या

हे रावणराज्य
केंद्र सरकारने पाच ते सहा भारतरत्न दिले. एक भारतरत्न स्वामिनाथन यांना दिलं. हमीभाव मिळाला पाहिजे, अशी तरतूद त्यांनी केली. स्वामिनाथन यांनी शेतकरी वर्गासाठी काम केलं, त्यांना भारतरत्न मिळाला. मात्र, ज्या शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देण्यसाठी ते झटले, त्यांच्यावर सरकार रोज अन्याय करतंय. हे रामराज्य नाही, हे रावणराज्य आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.

कर्नाटकट, तेलंगणा, केरळ ही राज्ये आंदोलन करून जीएसटीचा पैसा परत मागताहेत. मात्र, महाराष्ट्रमधल्या खोके सरकारने कधीही केंद्राकडे काही मागितलं नाही. राज्यात रोज शेतकरी आत्महत्या होतात, त्याला आळा घालण्यासाठी कुठलं पॅकेज जाहीर केलं नाही. ते फक्त मुंबईला शाह-मोदींच्यचा घशात घालत आहे. जे उरलं, ते गुजरातला पाठवलं जातयं, दिल्लीसमोर लोटांघण घालणारं हे मिंधे सरकार आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

आता हे भाजपचंही सरकार वाटेना
एकही नवा उद्योग राज्यात आला नाही. आज खर्च फक्त बॅनरवर खर्च होतोय, जाहिरातींवर खर्च होतोय. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी, युवक, महिलासाठी काही करत नाही. हे शेतकऱ्याचं, गरीबांचं सरकार नाही. आता हे भाजपचंही सरकार वाटेना, एवढं नेते भाजपने आपल्या पक्षात आयात केले, अशी जहरी टीका आदित्य ठाकरेंनी केली.

follow us