Download App

विद्यार्थ्यांचं आयडी जप्त करून सभेला हजर राहण्याची सक्ती, ठाकरे गटाची भाजपवर कडाडून टीका

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. अशातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विद्यार्थ्यांचे ओळखपत्र जप्त करून त्यांना निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी हजर राहण्याची सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुंबईतील एका महाविद्यालयात हा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. भाजपचे उमेदवार पीयूष गोयल (Piyush Goyal) यांचा मुलगा ध्रुव गोयल (Dhruv Goyal) यांनीने सभा घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावरून आता ठाकरे गटाने भाजपवर जोरदार टीका केली आहे.

छत्रपती शाहु महाराजांच्या भेटीवेळी तेजसची हजेरी; ऐन निवडणुकीच्या मौसमात आदित्य ठाकरे कुठे गायब?; 

कुठं घडला प्रकार?
उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांचा मुलगा ध्रुव गोयल यांनी मुंबईतील ठाकूर कॉलेजमध्ये एक सभा घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्याचं समोर आलं. परीक्षेच्या एक दिवस अगोदर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ओळखपत्रे हिसकावून विद्यार्थ्यांना भाजपच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास भाग पाडल्याचं बोलल्या जातं.

नवनीत राणांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा नाही; बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढली 

आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी ट्वीट करत लिहिलं की, या सत्ताधाऱ्यांना आता आपल्या देशात लोकशाही नांदूच द्यायची नाही. सध्या घडत असलेल्या काही घटनाच त्याची साक्ष देत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांच्या परिक्षेच्या एक दिवस आधी भाजपच्या उत्तर मुंबईच्या उमेदवाराच्या मुलाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली,असं आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं.

शिवसेनेनेही या घटनेचा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा बुरखा ठाकूर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फाडला. विद्यार्थ्यांची ओळखपत्रे जप्त करून त्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी हजेरीची सक्ती करणाऱ्या या पक्षाच्या हाती देशाचे भवितव्य कसे सुरक्षित राहणार? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

 

follow us