नवनीत राणांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा नाही; बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढली
Bachchu Kadu : सत्ताधारी महायुतीतील अमरावती लोकसभा मतदारसंघाचा (Amravati Lok Sabha Constituency) तिढा संपण्याऐवजी आणखीनच वाढताना दिसत आहे. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. कडू यांनी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. वेळ पडल्यास युतीतून बाहेर पडू, आणि स्वत:चा उमेदवार देऊ, पण नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, अशी आक्रमक भूमिका आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी घेतली आहे. कडू यांच्या भूमिकेमुळं भाजपची चांगलीच डोकेदुखी ठरली आहे.
वसंत मोरे यांचा पोपट झालाय.. पण ते मान्य करेनात!
बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना कडू म्हणाले, नवनीत राणा यांना आमचा अजिबात पाठिंबा राहणार नाही. त्यांनी जी परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची मानसिकाच नाही. वेळ पडल्यास युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ. अमरावती लोकसभा मतदारसंघात माझे दोन आमदार सोडून किमान एक लाख मते आहेत. खरा दावा तर आम्हीच करायला पाहिजे होता. पण, आम्हाला प्रामाणिकपणे काम करणं हे थोडं अंगलट येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही थोडं अडचणीत येतो.मात्र,गरज पडल्यास अमरावतीतून प्रहारचा उमेदवार देऊ, असं कडू म्हणाले.
Sanya Malhotra: सान्या मल्होत्राचा ‘मिसेस’ चित्रपट पोहचला हवाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
पुढं बोलतांना कडू म्हणाले की, वेळ आली तर आम्ही लोकसभेसाठी उमेदवारी देवूच. त्यांनी आमच्यासोबतची युती तोडायला सुरूवात केली आहे. तर आम्हीही ही युती तोडू. आम्हालाही वाईट वाटतेय. युतीतून बाहेर पडायचं नाही, असं आम्हालाही वाटतंय. पण, त्यांनाच आमच्याशी युती ठेवायची नाही तर आम्ही एवढे गुलाम नाहीत. आम्ही एवढं लाचार नाही, अशी टोकाची भूमिका कडू यांनी घेतली आहे.
अमरावतीची जागा भाजपकडेच राहणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, रामटेक मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा उमेदवार तिथून लढणार आहे आणि अमरावतीची जागा मात्र भाजपकडेच राहिल. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. अमरावती मतदारसंघात काही मतभेद आहेत. बच्चू कडू किंवा अडसूळ यांच्यात मतभेद असतील. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी सगळेच प्रयत्न करतील. त्यामुळे बच्चू कडू आमच्यासोबतच राहतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.