Ujjwal nikam On Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उन्हाळी सुट्टीपूर्वी या सत्तासंघर्षावर निकाल देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम (Ujjwal nikam) यांची प्रतिक्रिया आली आहे. येत्या दोन दिवसांत सत्तासंघर्षाचा निकाल येण्याची शक्यता आहे, असे उज्वल निकम यांनी म्हटले आहे
उज्वल निकम म्हणाले की आगामी सोमवारपर्यंत निकाल आला नाही, तर पुन्हा नव्यानं 5 जणांचं घटनापीठाची स्थापना करायला लागेल. तसेच नवीन न्यायाधीशांना नियुक्त करावं लागेल आणि नव्यानं पुन्हा सुनावणी होईल, असं मत उज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे.
Shinde VS Thackery : …तर उद्धव ठाकरे पुन्हा मुखमंत्री होणार, घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आठ ते नऊ याचिकांची सुनावणी एकत्रीत घेतली आहे. या सुनावणीच्या दरम्यान वेगवेगळे कायद्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. विषेशत: सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयी, नवीन विधानसभेच्या अध्यक्षाची निवड, उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव, दोन्ही गटाच्या व्हिपचा अधिकार तसेच राज्यापालांची कृती या सर्वांबद्दल निकाल अपेक्षित आहे. त्यामुळे हे महत्वाचे असेल की सुप्रीम कोर्ट हे पहिला मुद्दा घेऊन हा चेंडू विधीमंडळात टोलावते की यावर आपली काही निरीक्षण नोंदवतं, हे महत्वाचे असेल असे उज्वल निकम यांनी सांगितले.
Maharashtra Politics : निश्चिंत राहा! आम्ही सर्व कायदेशीर केलंय; काही तासातचं…
ते पुढं म्हणाले की निरीक्षणं नोंदवली तर ती कशा स्वरुपाची असतील. सुप्रीम कोर्ट हे स्वायत्त संस्थांना कधी मार्गदर्शन करत नाही पण काही निरक्षणं नोंदवते. त्यावेळी विधीमंडळाला देखील वेगळा विचार करावा लागतो. न्यायमंडळ आणि विधीमंडळ यांच्यात संघर्ष होऊ नये याची काळजी घेतली जाते, असे उज्वल निकम यांनी म्हटले आहे.