Download App

आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय नको, अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी कोणाची, या मुद्द्यावरून शरद पवार गट आणि अजित पवार गटात सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. दोन्ही गटांनी पक्षावर आपला दावा सांगितला आहे. सध्या याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) सुनावणी झाली आहे. दरम्यान, आता अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रतित्रापत्र दाखल केले आहे.

खातं हसन मुश्रीफांकडे आणि प्रश्न मला…; तानाजी सावंतांनी दाखवलं मुश्रीफांकडे बोट 

राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा आहे? याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शुक्रवारी पहिली सुनावणी झाली. या पहिल्या सुनावणीदरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट सुनावणीला हजेरी लावली होती. आपणच पक्षाचे संस्थापक आहोत. आपणच अध्यक्ष आहोत, त्यामुळं हा पक्षही आपलाच आहे, हे दाखवून देण्यासाठी पवार निवडणूक आयोगाच्या सुनावणीला हजर होते. यावेळी विधिमंडळ पक्ष आणि मूळ पक्ष यासंबंधीचे पुरावे दोन्ही गटाकडून सादर करण्यात आले.

त्याच दिवशी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सत्तापक्षासोबत गेलेल्या ज्या आमदारांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेसंदर्भात याचिका दाखले केली आहे. त्यात अजित पवार गटाचे ४१ आमदार अपात्र करण्याची मागणी करण्यात आली. आज किंवा उद्या हे आमदार अपात्र होणार असल्याचं बोलल्या जातं आहे. दरम्यान, ही याचिका लवकरात लवकर निकाली काढावी, यासाठी जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

तर आता अजित पवार गटानेही सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्त वाहिनीच्या सूत्राला ही माहिती दिली. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवार गटाने पक्ष चिन्हाबाबत कोर्टात याचिका दाखल केली, त्या याचिकेवर निर्णय देण्याआधी आमचं म्हणणं ऐकूण घ्यावं, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली. अजित पवार गटाने खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केलं आहे.

दरम्यान, दोन्ही गटाने आपल्या याचिका कोर्टात दाखल केल्या असून सुप्रिम कोर्ट काय निर्णय घेते, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us