BJP vs Shiv Sena : कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मिठाचा खडा पडला. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. तसेच मानपाडा पोलिस ठाण्यातून सक्तीच्या रजेवर पाठवलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे निलंबित होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने केला. दरम्यान, शिवसेना-भाजमध्ये कलगीतुरा रंगलेला असतांनाचा आता सोलापूरमध्येही या दोन गटात धुसफूस पहायला मिळत आहे. (After Kalyan, now in Solapur too, there is a rift between BJP and Shiv Sena. Shiv Sena leader sanjay kokate alleges BJP)
शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पालकमंत्री आणि खासदार हे शिवसेनेला वेळ देत नाहीत. आमची कोणतीही कामे होत नाहीत. केवळ भाजपच्या लोकांची कामे केली जातात. सोलापूरमध्येही भाजपकडून शिवसेनेवर अन्याय सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी कोकोटेंनी कल्याण भाजपचा निषेध केला ते म्हणाले की, गेल्या चोवीस तासात टिव्हीवर कल्याण भारतीय जनता पार्टीने शिवसेनेशी असहकार करण्याच्या भूमिकेचा ठराव केला. त्याचा निषेध आहे. भाजपच्या शिर्ष नेत्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यावं की, आपण एकनाथ शिंदे यांच्यामुळं सत्तेत आहोत.
शिवसेना फोडली, धनुष्यबाण गद्दार गटाला दिला तरीही भीती, ‘ये डर अच्छा है’; राऊतांचा शाहांवर हल्लाबोल
ते म्हणाले, आम्ही जीवाचं रान करून आम्ही भाजपाच खासदार इथं निवडून दिला. मात्र, भाजपच्या अंतर्गत गटबाजीमुळं आम्ही ज्यांचा विरोध पत्करला, त्याचं मंडळींना सोबत घेतलं जातं. उद्या भाजपमधील अंतर्गत बंडाळी मिटेल. पण, शिवसेना असेल, मित्र पक्ष असतील, येणाऱ्या काळात भाजपच्या उमेदवाराचा खासदारकीला प्रचार करतील, असं नाही. भविष्यात आमच्या मदतीचं अपेक्षा ठेऊ नका, असं कोकाटे म्हणाले.
एकनाथ शिंदे जर भाजपसोबत नसतील तर भाजपचं काय होईल, याचा विचार करा. तुम्ही हवेतले उड्डाणं बंद करा, सल्लाही त्यांनी दिला.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची कामं होत नसल्याचा आरोप शिंदे गटाने केला होता. आता सोलापुरात शिवसेनेचे कोकोटे यांनी भाजपवर असाच आरोप केला आहे. त्यामुळं भाजप-सेना युतीत तणाव निर्माण झाला.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे काय प्रतिक्रिया देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.