Download App

सुप्रिया सुळेंनंतर आता भुजबळही सरोज आहिरेंच्या भेटीला; त्या नेमक्या आहेत तरी कुठे?

Chhagan Bhujbal : देवळालीच्या आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) या आजारी असल्याने नाशिकमधील संजीवणी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नुकतीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरोज आहिरेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सरोज अहिरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळं आता सरोज आहिरे थोरल्या पवारांसोबत जाणार की, धाकट्या पवारांसोबत जाणार? याविषयीच्या ऊत आला. (After Supriya Sule now Chhagan Bhujbal met Saroj Ahire)

सरोज आहिरे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडखोरीपासून चर्चेत आहेत. अनेक आमदारांना आपल्या गोटात खेचून अजित पवारांनी शरद पवारांना मोठा धक्का दिला. अजित पवारांच्या बंडखोरीच्या काळात काही आमदारांनी तात्काळ अजित पवारांच्या गोटात सामील होण्याऐवजी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तटस्थ आमदारांच्या या यादीत सरोज आहिरे यांचाही समावेश आहे. दरम्यान, त्या आजारी असून सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. सुप्रिया सुळेंनी आहिरेंची भेट घेताच आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनीही त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

भुजबळ यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर या भेटीचे तपशील दिले आहेत. त्यांनी लिहिलं की, सरोज अहिरे यांची तब्येत बरी नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉ. मधुर केळकर-कुलकर्णी यांच्याशी आमदार सरोज अहिरे यांच्यावर सुरू असलेल्या उपचाराबाबत चर्चा केली. त्यांना गरजेनुसार उपचारासाठी मुंबईला हलवण्यात येणार असल्याचं सांगितलं. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहाराध्यक्ष रंजन ठाकरे, संजय खैरनार, कैलाल मुदलीयार, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Sujay Vikhe : नगर लोकसभेसाठी पक्ष देणार त्या उमेदवाराचा प्रचार करणार 

तर खासदार सुळेंनीही सरोज आहिरे यांची भेट घेतली होती. आहिरेंची घेल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होतं की, सरोजताई माझी बहीण असून माझ्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती रुग्णालयात असेल तेव्हा त्या व्यक्तीची विचारपूस करणे ही माझी जबाबदारी आहे. हे प्रेमाचं नातं आहे, यात राजकारण येत नाही, असं म्हणाल्या.

दरम्यान, आता भुजबळ यांनीही त्यांची भेट घेतली.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 30 हून अधिक आमदारांनी राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केली आहे. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ज्या बावन्न आमदारांनी पाठिंब्याच्या पत्रावर सही केली, त्यात सरोज आहिरे देखील आहेत. त्यानंतर त्या दोन दिवस नॉट रिचेबल होत्या. दोन-तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी वेगवेगळ्या आमदारांची बैठक बोलावली. या दोन्ही बैठकांना सरोज आहिरे अनुपस्थित राहिल्या. त्यामुळे आता त्या कोणत्या नेत्याखाली काम करणार, असा प्रश्न मतदारसंघातील नागरिकांना पडला. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व आमदार अजित पवार यांच्या गटात सामील झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आज आमदार आहिरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळेच त्या अजित पवार यांच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चा आहेत.

Tags

follow us