Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राचा सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठे विधान केले आहे. काही लोक गणपती पाण्यात बुडून प्रार्थना करत आहे पण सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आमच्या बाजूने लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. निकाल काहीही लागला तरी आम्ही स्वागत करणार आहे. या निकालाकडून आम्हाला अपेक्षा आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल. आम्ही कायदा आणि नियमाप्रमाणे काम केले आहे, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांना सुनावले
ते पुढं म्हणाले की निकाल आमच्या विरुध्द गेला तरी आम्ही त्याचे हसत खेळत स्वागत करू. शेवटी सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आम्ही प्रतिक्रिया दिली आहे. चांगली दिली वाईट दिली जे व्हायचे ते होणार आहे आणि येणारा निकाल आमच्या बाजूने येईल, असे अब्दुल सत्तार म्हणाले.
काही लोक गणपती महाराजांना पाण्यामध्ये बुडून प्रार्थना करू लागले आहेत पण काही होणार नाही. आमचे मुख्यमंत्री खैरेंपेक्षा जास्त हिंदुत्ववादी आहेत. आमचे मुख्यमंत्री हिंदुत्ववादाला मानणारे आहेत. राज्यभर हितचिंतक आमची शिवसेना राहावी, शिवसेनेचा मुख्यमंत्री राहो यासाठी पूजापाठ करत आहेत. मला वाटतं खैरेही त्यासाठीच बसले असतील, अशी प्रतिक्रिया कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.