Download App

Abdul Sattar : सत्ताराचं विधान पुन्हा चर्चेत; म्हणाले आधी जे गरीब खात होते तेच…

  • Written By: Last Updated:

बीड : आधी जे गरीब खात होते, तेच गहू तांदूळ श्रीमंत खातायत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. बीडमधील आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार दिवस (International Nutrition Day) कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार कार्यक्रम साजरा करू लागलो, एक वेळ अशी होती की हे जेवण, पहिला गरीबांचा होता. (Maharashtra Politics) तुम्ही पाहिले असाल ज्वारी असेल गहू असेल हे पीक पहिले गरीब खात होते. जमाना बदलला, जे गरीब खात होते. ते आता श्रीमंत खात आहेत. हे जे बदल झालेला आहे. हा बदल रासायनिक खतामुळे मोठ्या प्रमाणावर जे उत्पन्न आहे, त्यामुळे झाला आहे.

याआधी देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी वक्तव्य करत वाद ओढावून घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यावर पदवी मिळत असली तरी सर्वांना काही नोकऱ्या मिळणार नाहीत असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तरुणांना रोजगार देऊन स्वतः पायावर उभे करण्याचं काम केलं जाईल, असे म्हणत असतानाच सत्तार यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावेळी ते बोलत होते.

Delhi Excise Policy Case : मनीष सिसोदियांना मोठा धक्का; कोठडीतला मुक्काम वाढला

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बीडमध्ये बोलताना केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत. ‘आधी जे गरिब खात होते ते आता श्रीमंत खात आहेत’ असं अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला होता. त्यातच आता सत्तार यांच्या या विधानाने पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.

Tags

follow us