Download App

आधी बरळले आता माफीनामा! कर्जमाफीच्या विधानावर कृषीमंत्री कोकाटेंचा युटर्न…

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावर आज माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केलीयं.

Minister Manikrao Kokate : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकोटे (Manikrao Kokate) यांनी शेतकऱ्यांना सुनावलं होतं. यासंदर्भातील व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकरणी बोलताना आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केलीयं. कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत असल्याच कोकाटेंनी स्पष्ट केलंय.

पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मानसन्मान दुखावला गेला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं माणिकराव कोकाटे म्हणाले आहेत.

संपूर्ण देश विकून झाल्यावर… वक्फची संपत्ती दिसली, संजय राऊतांनी साधला PM मोदींवर निशाणा

काय म्हणाले होते कोकाटे?
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीच्या संदर्भात बोलताना शेतकऱ्यांना सुनावलं होतं. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ‘कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफीच्या पैशांनी काय करता?’, असा अजब सवाल कृषीमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला होता. त्यांच्या या विधानानंतर राज्यातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल की नाही? असा सवाल एका शेतकऱ्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला होता. यावर उत्तर देताना कोकाटे यांनी शेतकऱ्यालाच सुनावलं होतं. ते म्हणाले होते जे नियमित कर्ज भरतात त्यांनी का बरं कर्ज भरावं? कर्ज घ्यायचं आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहायची. तोपर्यंत कर्जभरायच नाही. मला एक सांगा आता येथे मीडिया आहे. मीडियासमोर असं बोलत नाही.

पाकिस्तान चीनच्या जाळ्यात! अमेरिकेनंतर आता चीनचाच पर्याय; धक्कादायक अहवाल उघड

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एक रुपयांची तरी गुंतवणूक करता का? सरकार तुम्हाला आता शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे देणार आहे. सरकार तुम्हाला पाईपलाईनाला पैसे, सिंचनासाठी पैसे, शेततळ्यासाठी पैसे देणार आहे. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. मग शेतकरी भांडवली गुंतवणूक करतात का? शेतकरी म्हणतात पीक विम्याचे पैसे पाहिजे मग त्यातून साखरपुडे करा, लग्न करा, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठवली. त्यानंतर अखेर आज माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागितलीयं.

follow us