पाकिस्तान चीनच्या जाळ्यात! अमेरिकेनंतर आता चीनचाच पर्याय; धक्कादायक अहवाल उघड

पाकिस्तान चीनच्या जाळ्यात! अमेरिकेनंतर आता चीनचाच पर्याय; धक्कादायक अहवाल उघड

Pakistan News : पाकिस्तानचे सैन्य आता शस्त्रास्त्रांसाठी पूर्णपणे चीनवर (Pakistan News) अवलंबून आहे. अमेरिकेने जेव्हापासून पाकिस्तानपासून स्वतः ला दूर केले आहे तेव्हापासून पाकिस्तानला फक्त चीनचाच (China) पर्याय राहिला आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटचा ताजा अहवाल समोर आला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मागील पाच वर्षांच्या काळात पाकिस्तानने जितकी शस्त्रास्त्रे खरेदी केली आहेत त्यातील 81 टक्के एकट्या चीनमधून आली आहेत.

याआधी हा आकडा 74 टक्के होता. म्हणजेच आता पाकिस्तान चीनच्या सापळ्यात पुरता अडकला आहे. चीनशी चांगले संबंध करून सैन्याला अधिक बळकट करण्याचे स्वप्न पाकिस्तानी राज्यकर्ते पाहत आहेत. पण यामुळे फक्त एकाच देशावर आवश्यकतेपेक्षा जास्त अवलंबित्व धोकादायक आहे ही गोष्ट या लोकांच्या लक्षात येत नाही.

पाकिस्तानी सैन्याला आवश्यक असणारी प्रत्येक गोष्ट आता चीनच्या मदतीशिवाय शक्य नाही. या सर्व वस्तू चीनमधूनच मागवाव्या लागत आहेत. रायफल, फायटर जेट, युद्ध नौका या सगळ्याच गोष्टींसाठी पाकिस्तान चीनवर अवलंबून आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

पाकिस्तान सरकारला देशातच आव्हान, ‘या’ राज्याने आदेश मानलाच नाही; काय घडलं?

पाकिस्तान सरकार सध्या जे 35 ए सारखे लढाऊ विमान खरेदीच्या प्रक्रियेला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे. या विमानांची किंमत अब्जावधी डॉलर असू शकते. याबरोबरच जे 17 जेट, विटी 4 टँक, ड्रोन आणि गाईडेड मिसाईल फ्रिगेट सगळे काही चीनमधूनच येणार आहे. आता या गोष्टी चीनमधून येत असल्या तरी भविष्यात पाकिस्तानला त्रासदायक ठरू शकते असे तज्ञांना वाटत आहे.

भारत होतोय आत्मनिर्भर

एकीकडे पाकिस्तान चीनवर अवलंबून राहत आहे तर दुसरीकडे भारत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विदेशातून खरेदी कमी करून देशातच त्या वस्तू तयार करण्यावर मोदी सरकारचा भर आहे. मेक इन इंडिया हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. भारत आता स्वतः तयार केलेल्या हत्यारांवर फोकस करत आहे. इतकेच नाही तर भारत आता हत्यारे निर्यातीतही वेगाने काम करत आहे. फिलिपिन्सला ब्रह्मोसची विक्री केल्यानंतर आता इंडोनेशिया, व्हिएतनाम, म्यानमार यासारखे देश भारताच्या यादीत आहेत.

पाकिस्तानला हत्यारे तयार करण्यासाठी सुद्धा चीनची टेक्नॉलॉजी आणि कच्च्या मालाची आवश्यकता आहे. भारत मात्र राफेल, अपाचे आणि आयएनएस तुशील सारखे हत्यारे विदेशातून खरेदी करत आहेच शिवाय टेक्नॉलॉजी ट्रान्स्फरच्या मदतीने देशांतर्गत निर्माणावरही भर देत आहे. भारताकडून भविष्य अधिक चांगले करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. पण पाकिस्तान मात्र चीनच्या जाळ्यात पुरता अडकला आहे. या जाळ्यातून बाहेर पडणे आता खूप कठीण आहे.

श्रीलंका, नेपाळ अन् पाकिस्तान चीनच्या सापळ्यात मित्र देश कंगाल; आता ‘हा’ देश चीनच्या रडारवर..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube