अहिल्यानगरमध्ये महायुती फिस्कटली ! शिंदेसेना स्वबळावर लढणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी जाहीर केलीय.

ahilyanagar-mahapaika-election-shindesena-will-fight-alone

WhatsApp Image 2025 12 29 At 8.32.48 PM

Ahilyanagar Mahaplika Election: अहिल्यानगर महानगरपालिकेमध्येही (Ahilyanagar Mahapalika Election) महायुती फुटली आहे. महायुतीमध्ये सन्मानजक जागा मिळत नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने (Shivsena) स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय सोमवारी सायंकाळी जाहीर केलीय. नगर शहरामध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढू शकतात. परंतु अजूनही त्यांनी जाहीर केलेले नाहीत. तर शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे नगरमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

पुणे तिथे काय उणे! उमेदवाराने अर्ज शुल्क म्हणून भरली 5 हजार रुपयांची चिल्लर


सेनेचे 50 जागांवर उमेदवार असणार

महायुतीमध्ये शिवसेनेने 24 जागांची मागणी केली होती. सेनेकडे 23 विद्यमान नगरसेवक आहे. तर दुसऱ्या पक्षातील एक नगरसेवक शिवसेनेत आला आहे. म्हणजे शिंदेसेनेकडे 24 माजी नगरसेवक आहेत. आमच्याकडे असलेल्या माजी नगरसेवकांना देखील उमेदवारी देण्यास मित्र पक्षाची तयारी नव्हती, त्यामुळे स्वंतत्र लढण्याची निर्णय शिवसेनेने आज जाहीर केलाय. 68 पैकी 50 च्या उमेदवार आमच्याकडे आहेत. स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढविली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेनेचे प्रभारी संजीव भोर अनिल शिंदे, संभाजी कदम, संजय जाधव यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेकिंग : BMC साठी काँग्रेसचे तगडे 87 उमेदवार जाहीर; ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातील नावामुळे फाईट ‘टफ’


भाजप-राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा मार्ग मोकळा

राष्ट्रवादी व भाजपमध्ये सातत्याने बैठका होत जागा वाटप अंतिम टप्प्यात आले आहे. शिंदेसेना बाजूला झाल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र लढण्याचा मार्गही मोकळा झालाय.त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता जागा वाटपाचा तिढा राहणार नाही, असे समोर येत आहे.

कोतकर गट कुणाबरोबर जाणार ?

माजी महापौर संदीप कोतकर व ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे केडगाव भागात वर्चस्व आहे. या भागातून सहा ते सात नगरसेवक निवडून आणण्याची त्यांची ताकद आहे. परंतु कोतकर गट अजूनही कुठल्याही पक्षात गेलेले नाही. त्यामुळे कोतकर गट स्वतंत्र लढतो की कोणत्या पक्षाबरोबर जाते हे काही वेळात समोर येईल.

Exit mobile version