Download App

गुंडगिरी! तर थेट तुमच्याशी दोन हात करू… निलेश लंकेंचं विखेंना ओपन चॅलेंज

Nilesh Lanke open challenge to Minister Radhakrishna Vikhe : अहिल्यानगरचे (Ahilyanagar) खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना ओपन चॅलेंज दिलंय. सुपा एमआयडीसीमध्ये गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांच्याकडून केला जातोय. तर निलेश लंके हे मात्र आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

एमआयडीसीमध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे मी पंतप्रधानांना पत्र दिलंय. पवार साहेबांच्या माध्यमातून मी लवकरच पंतप्रधानांना भेटणार आहे. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना पत्र (Ahilyanagar News) दिलंय. हा घटनाक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे. शेवट आम्हाला एमआयडीसी वाढली पाहिजे. आमच्या बेरोजगार तरूणांना रोजगार मिळाला पाहिजे. ही यामागे सर्वात महत्वाची भूमिका आहे.

प्रार्थना स्थळ अन् मशिदीवरील भोंग्यावर कारवाई होणार; मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

चोर तो चोर आणि शिरजोर, अशी टीका देखील निलेश लंके यांनी केलीय. काचेच्या घरात राहणारे दुसऱ्यांना दगड मारतात. काहीही झालं की, सुपा एमआयडीसीतील गुंडगिरी संपवायची. सुपा एमआयडीसीतील दहशत (Maharashtra Politics) थांबवा. अरे काय गुंडगिरी आहे? सुपा एमआयडीसीमध्ये काय गुंडगिरी आहे, हे पाहा. सुपा एमआयडीसीमध्ये काय दहशत आहे? सुपा एमआयडीसीसारखं आनंदी वातावरण कुठल्याच एमआयडीसीमध्ये नाही, असं देखील निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.

नगर एमआयडीसीची काय परिस्थिती झालीय? नगर एमआयडीसी बंद पडली ना, तुम्ही जे आरोप करत आहात. तर तुम्ही तुमच्या भागात एखादा उद्योग आणायचा ना. सुपा एमआयडीसीमध्ये कोणत्या उद्योजकाची तक्रार नाही. कोणाची तक्रार नाही. पण उठसुठ सांगायचं की, गुंडगिरी चालु आहे. तर गुंडगिरी कोणाची आहे, हे नाव घेवून सांगा.

महाराष्ट्रात हलाल, झटका, मल्हार हे काय लावलंय; जितेंद्र आव्हाडांनी का केला असा सवाल?

जर तुम्हाला वाटतं असेल की, आम्ही गुंडगिरी करतो. तर आमचं म्हणणं आहे की, आम्ही गुंडगिरी करत आहे. पण तुम्ही म्हणत आहे ना, तर आमची तुमच्याशी गुंडगिरी करायची तयारी आहे. तुम्ही सांगा, आम्ही तुमच्याबरोबर दोन हात करू. तुम्ही वेळ-काळ सांगा, असं ओपन चॅलेंज निलेश लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना दिलंय. मागून याला त्याला त्रास देण्याचं काम करू नका. सुपा एमआयडीसीचं वातावरण खराब होवू देणार नाही, अशी भूमिका देखील खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली आहे.

 

follow us