Download App

जनतेचे प्रेम, हेच माझ्या विकास कामांची पावती; संग्राम जगताप यांनी मानले जनतेचे आभार

Ahmednagar Assembly Election Sangram Jagtap Campaigning : विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना (Sangram Jagtap) तिकीट देण्यात आलंय. उमेदवारी अर्ज भरत संग्राम जगताप यांनी प्रचारसभांचा धडाका सुरू केलाय. जनतेचे प्रेम हेच माझ्या विकास कामांची पावती, असं म्हणत त्यांनी जनतेनचे आभार मानले आहेत. संग्राम जगताप यांनी प्रचाराचा नारळ फोडत नगर शहरातून प्रचाराला सुरुवात केलीय.

नागरिकांच्या सहकार्यातून विकास कामांची मुहूर्तमेढ उभी केली. त्यासोबत सतत जनतेच्या संपर्कात राहून प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या (Ahmednagar Assembly Election) पार्श्वभूमीवर मतरुपी आशीर्वाद घेण्यासाठी थेट जनतेच्या दारात जात असताना नागरिक मोठ्या उत्साहात स्वागत करताना पाहावयास मिळत आहे, जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम पाहून मन भारावून गेलोय, अशी प्रतिक्रिया संग्राम जगताप यांनी दिलीय.

Video : शिवसेनेच्या माजी आमदाराची जीभ घसरली; शिवसेना एक सुंदर स्त्री… मात्र लोक आता…

शहरात गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे नागरिक, महिला ठिकठिकाणी मोठ्या संख्येने घराबाहेर येत औक्षण करत पेढे खाऊ घालत आहे, या माध्यमातून मी केलेल्या कामाची पावतीच मला मिळत आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार संग्राम जगताप यांनी जाधव मळा सरोदे कॉलनी हडको दातरंगे मळा परिसरातील नागरिकांची विकास यात्रेच्या माध्यमातून संवाद साधला.

CM शिंदेंच्या मतदारसंघात ट्विस्ट! काँग्रेसच्या बंडखोरीने केदार दिघेंची डोकेदुखी वाढणार
यावेळी माजी नगरसेवक दगडू मामा पवार, प्रा. अरविंद शिंदे, युवराज शिंदे, गणेश दातरंगे, हरिभाऊ येलदंडी, काका शेळके, वैभव वाघ, शुभम दातरंगे, दादा पांडुळे, भरत जाधव, योगेश जाधव, सनी जाधव, राजू कोकणे, सनी आगरकर, शरद दातरंगे, मनोज आंबेकर, अरुण कटके, संतोष लांडे, प्रथमेश आगरकर, साहिल शिंदे, अनमोल वांढेकर, दीपक गुंडू, सचिन मुदगल, अंकुश बुरा, भाऊ पुंड, गौरव बोरुडे, पप्पू शिंदे, उद्धव म्हस्के, सनी शिंदे, भैय्या लेंडकर, रवी कापसे, स्वप्निल अडसूळ, स्वप्निल सुडके, प्रशांत बेल्हेकर, करण नागापुरे, रोहन शिरसाट, अनिकेत चव्हाण, जुबेर शेख, राकेश भंडारी, शुभम बुरा, योगेश झिंजे, सागर कदम, राम वाघ, राजू पाथरे, गौरव खंडागळे, चेतन शेलार आदी उपस्थित होते.

 

follow us