Download App

लोकसभेच्या तोंडावर धमाका; सोलापुरला होणार मोठी कामगार वसाहत, मोंदीच्या हस्ते होणार लोकार्पण

Solapur News: सूतगिरणीची खाण अशी ओळख असणाऱ्या सोलापूरात देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत उभा करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. (PM Modi) वस्त्रोद्योग असेल किंवा विडी उद्योग अशा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधील हजारो कामगार सोलापुरात सध्या काम करत आहेत. सध्या गरिबी पाचवीला पूजलेली असताना या कामगारांना मोडक्या तोडक्या घरात राहण्याशिवाय पर्याय नाही.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

परंतु संपूर्ण आयुष्य फक्त झोपडपट्टीमध्ये घालवणाऱ्या या कामगारांचे स्वतःच्या हक्काचं घर स्वप्न साकार होत असल्याचे लवकरच बघायला मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत म्हणून सोलापुर शहरातल्या रे नगर येथे साकारत आहे. या वसाहतीच्या लोकार्पणासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे स्वतः सोलापूरला हजेरी लावणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. रे नगर येथे उभा करण्यात आलेल्या वसाहतीत एकूण ३५० एकराचे परिसर असल्याचे सांगितलं जात आहे. यात एकूण ८३४ इमारती आणि ३० हजार फ्लॅट्स कामगारांना मिळणार आहेत. सध्या सोलापुरामध्ये उभा करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाला देशातील सर्वात मोठी कामगार वसाहत म्हणून ओळखली जात आहे.

सोलापुर येथील कुंभारी गावामध्ये या वसाहतीच्या पहिल्या टप्प्यामधील १५ हजार घरांचे लोकार्पण लवकरच पार पडणार असल्याची सध्या माहिती मिळाली आहे. ९ जानेवारी २०१९ दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे उदघाटन करणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये सलग ४ वर्ष जवळपास १० हजार कामगारांनी मिळून हा भव्य प्रकल्प उभा केल्याचे सांगितले जात आहे. आयुष्यभर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कामगारांना देखील स्वतःचं हक्काच घर आता मिळणार आहे, हे उद्दिष्ट समोर ठेवून पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे बांधण्यात आली आहे. या ठिकाणी फक्त डोक्यावर छत नाही तर सोयी सुविधा देखील पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे.

Rohit Pawar : मला जिथे पाहिजे तिथे सगळीकडे… राणेंच्या दाढीबद्दलच्या टीकेला रोहित पवारांचे उत्तर

कशी असणार नेमकी रचना ?

-एकूण परिसर ३५० एकर

-यामध्ये एकूण ८३४ इमारत

– प्रत्येक इमारतीमध्ये ३६ घरे

– एकूण ३० हजार फॅमिलीसाठी घरे

– एकूण ६० मेगावॅट विजेचे प्रकल्प कामाला सुरुवात सध्या २० मेगावॅटचे काम पूर्ण

– तसेच परिसरात ७ मोठ्या पाणी टाकी, त्याची क्षमता २९ MLD असणार

– यामुळे २४ तास पाणी पुरवठा राहणार

-परिसरामध्ये मलशुद्धीकरण केंद्र असणार

-स्वतंत्र घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा

-विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदतर्फे शाळा, अंगणवाडी शाळांची सोय

– चिमुकल्यांना खेळण्यासाठी क्रीडा मैदान

– हॉस्पिटलाची सुविधा

-लोकांच्या रोजगारासाठी व्यवसाय देखील उपलब्ध करण्याचे प्रयत्न

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सांगण्यावरुनच जिल्हा बँकेने ‘श्री गणेश’ला कर्ज नाकारले

यामध्ये अशी व्यवस्था उभा करण्याचा प्रयत्न सध्या रे नगर या ठिकाणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी हे ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे. या प्रकल्पासाठी अहोरात्र  काम सुरु असल्याचे सध्या बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. २०२४ मध्ये यातील काही घराच्या चाव्या मिळणार असल्याने कामगारांना देखील आता सोन्याचे दिवस पाहता येणार आहेत. गेल्या १० वर्ष केलेल्या नरसय्या आडम यांच्या प्रयत्नांना राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीमुळे सोलापूरकरांना आता सुखाचे दिवस बघायला मिळणार आहेत.

Tags

follow us