गेल्या काही दिवसापासून राज्यात पडद्यामागे अनेक घडामोड़ी घडत असल्याच्या चर्चा आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील एकनाथ शिंदे यांचे सरकार जाऊन राज्यात नवीन सरकार येईल त्यात राष्ट्रवादी भाजप सोबत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी भाजपसोबत नाही गेली तरी राष्ट्रवादी पक्षातील एक गट भाजपसोबत जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नुकतेच त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी अशा काही मुद्द्यावर भाष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरही भाष्य केलं होत. या मुलाखतीमध्ये त्यांनी भविष्यात कोण काय करेल याचा भरवसा नाही, असं वक्तव्य केलं आहे
या मुलाखतीमध्ये शरद पवार यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी पुन्हा एकदा तशा शपथविधीची शक्यता आहे का? असा देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी भविष्यात कोण काय करेल याचा भरवसा नाही, असं संदिग्ध उत्तर दिल. पण त्याच वेळी त्यांनी तो वैयक्तिक निर्णय असू शकतो. अशी पुष्टी देखील जोडली. त्यामुळे शरद पवार यांच्या या वक्तव्यावरून अनेक चर्चा सुरु झाल्या.
आज शरद पवार काही कार्यक्रमानिमित्त पुण्यात होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी अजित पवार भाजप जाण्याची शक्यता वर्तवल्या जात आहेत. यावर प्रश्न विचारले, त्यावर शरद पवार उत्तर न देता निघून गेले. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
आज सकाळी शरद पवार पुण्यात होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना भेटून राज्यातील घडामोडीवर प्रश्न विचारले. त्यावेळी काय घडलं हे वाचा.
प्रश्न – दिल्लीत काल बैठका झाल्या तेजस्वी यादव राहुल नितेश कुमार भेटले राष्ट्रवादीचे कोणी दिसलं नाही …
उत्तर – मी नव्हतो तिथे मला बोलवलं होतं मला इथे काही काम होती मला आज आणि उद्या. मी उद्या दिल्लीला जाऊन भेटेन. त्या सगळ्याला सहकार्य आहे. माझा पाठिंबा आहे.
प्रश्न – राज्य सरकारबद्दल वावड्या उठत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईल आणि राष्ट्रवादी सोबत जाईल अजित पवार ….
उत्तर न देता शरद पवार निघून गेले