Download App

Ajit Pawar : मी लेचापेचा नाही, मला राजकीय आजार होत नाही; अजितदादांकडून विरोधकांचा समाचार

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्यावर आजारपणावरून होणाऱ्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘मला डेंग्यू झाल्यानं 15 दिवस गेले. मला राजकीय आजार आहे. असं मी टिव्ही वर बघितलं. पण मी लेचापेचा नाही. माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही.’ असं अजित पवार म्हणाले आहे.

मी लेचापेचा नाही, मला राजकीय आजार होत नाही…

गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना डेंग्यूची लागण झाली होती. तर त्याच दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला होता. आक्रमक झालेल्या मराठा समाजाने ठिकठिकाणी आंदोलनं आणि हिंसक घटना देखील घडल्या होत्या. मात्र या दरम्यान अजित पवार आजारी असल्याने ते माध्यमांसमोर येत नव्हते. तसेच ते कोणत्याही बैठका आणि काम काजात सहभागीही होत नव्हते. त्यावरून मनोज जरांगे त्यांची मुलगी आणि इतर लोकांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती.

Jhimma 2: ‘झिम्मा 2’ची ग्रँड ओपनिंग! पहिल्याच दिवशी केली कोटींची कमाई

यामध्ये रामदास कदम यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली होते. समाज अंगावर आला तेव्हा अजित पवार यांना डेंग्यू झाला अशी खोचक टीका कदम यांनी केली होती. तसेच मनोज जरांगे यांच्या मुलीने देखील अजित पवार मराठा आरक्षणाचा विषय आला की, लगेच आजारी पडतात असा खोचक टोला लागावला होता.

Uddhav Thackeray : ‘2014 पासून देशाच्या पाठीमागे ‘पनौती’.. ठाकरे गटाची खोचक टोलेबाजी

यामध्ये माध्यमांमध्ये अजित पवार यांना खरंच डेंग्यू झाला आहे. की, हा राजकीय आजार आहे. असा सावाल उपस्थित केला जात होता. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी खंत व्यक्त करत स्पष्टीकरण देखील दिले. ते म्हणाले की, ‘मला डेंग्यू झाल्यानं 15 दिवस गेले. मला राजकीय आजार आहे. असं मी टिव्ही वर बघितलं. पण मी लेचापेचा नाही. माझ्या स्वभावात राजकीय आजार वगैरे नाही.’ तसेच यावेळी त्यांनी अमित शाहंच्या भेटीबद्दल देखील सांगितले की, ‘मी अमित शाह यांच्याकडे तक्रार करायला गेलो अस बोललं गेलं,मी तक्रार करणारा नाही.’

follow us