Sana Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मोठी घोषणा करत राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची कन्या सना मलिक (Sana Malik) यांची पक्षाच्या प्रवक्ते पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
एका जाहीर सभेत बोलताना सना मलिक यांनी पक्षाची प्रवक्ता म्हणून घोषित करत आहोत, असं अजित पवार म्हणाले. आमच्या पक्षात आम्हाला महिलांना आणि तरुणांना संधी द्याची आहे त्यामुळे आम्ही पक्षाच्या प्रवक्ते पदावर सना मलिक यांची नियुक्ती करत आहे असं अजित पवार या जाहीर सभेत म्हणाले.
या सभेत बोलताना पुढे अजित पवार म्हणाले की, सना मलिक यांचं हिंदी आणि इंग्लिश चांगलं आहे, मराठीही चांगलं होईल, त्यांना कसलीही गरज लागली तर आम्ही अगदी रात्री 12 वाजता सुद्धा त्यांच्या पाठीशी आहोत असेही यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.
कोणत्याही समाजावर अन्याय होऊ देणार नाही : अजित पवार
या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, जर वक्फ बोर्डाच्या बाबतीत अल्पसंख्याकांवर अन्याय होत असेल तर ते आम्ही कदापि होऊ देणार नाही आणि हे फक्त अल्पसंख्याकांचे नाही, कोणत्याही समाजावर अन्याय होणार असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.
Video : मोठी बातमी! MIM च्या पत्रकार परिषदेमध्ये राडा; पहा व्हिडिओ
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आज विरोधक लाडकी बहीण योजनेवरून आमच्यावर टीका करत आहे. ही योजना फक्त निवडणुकीसाठी आहे असं विरोधक म्हणत आहे मात्र ही योजना मी आणली आहे. आम्ही या योजनेसाठी बजेटची देखील तरतूद आम्ही केली आहे. त्यामुळे ही योजना पुढे देखील सुरु राहणार अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी यावेळी दिली.
WhatsApp कॉल करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आता कॉलिंगसाठी होणार मोठा बदल