Ajit Pawar In Baramati : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून ज्या मतदारसंघाची चर्चा झाली तो मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे. तिथे यावेळी नणंद भावजयी असा थेट राजकीय सामना होत आहे. यामध्ये महायुतीच्या सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्या दिवसापासून जोरदार प्रचाराला लागले आहेत. आजही त्यांनी बारामतीत प्रचार सभेत बोलताना जोरदार फटकेबाजी केली.
बारामतीत मत खरेदीसाठी दिडशे कोटींचा वापर; Rohit Pawar यांचा अजितदादांवर गंभीर आरोप
भावनिक होऊ नका
यावेळी अजित पवारांनी नाव न घेता सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले काहींनी 2019 ला घोषणा केली होती की, आम्ही एमआयडीसी आणली नाही तर मत मागायला येणार नाहीत. परंतु, ते मत मागायला आले आणि तुम्ही निवडून दिलं. मात्र, आता असं भावनिक होऊ नका. तुमच्या रोजी रोटीची निवडणूक आहे असंही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.
मी शब्दाचा पक्का आहे
मी एक तर सहजा सहजी शब्द देत नाही. आणि शब्द दिला तर कोणाच्या बापाचं ऐकत नाही. कारण आम्ही इतरांसारखे खोटं बोलत नाही. मी जर म्हणालो असतो निवडून द्या, मी एमआयडीसी आणतो आणि आणली नसती तर आज शरमेने लाज वाटली असती असं म्हणत अजित पवार यांनी सुळे यांना टोला लगावला आहे. त्यामुळे मी शब्दाचा पक्का आहे. दिला तो शब्द पाळतोच असंही अजित पवार म्हणाले.
देशाच भवितव्य घडवणारी ही निवडणूक
आजही देशात काही भागांत मुलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहेत. तरीही हे प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या ही निवडणूक भावकी किंवा गावकीची नाही. तर, देशाच भवितव्य घडवणारी ही निवडणूक आहे. आज तुमच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे असं म्हणत अजित पवार यांनी उपस्थितांना सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याची विनंती केली.
सकाळी पाचला उठून सहाला कामाला लागतो
यावेळी अजित पवारांनी स्वत:ता दनक्रम सांगितला. पवार म्हणाले, मला विकासाची आवड आहे. राज्याच्या भल्याचा माझा विचार आहे. मी रात्री 1 वाजता झोपलो तरी 6 वाजता उठून काम करतो. मुंबई, पुणे, बारामती यापैकी कुठही असलो तरी सकाळी पाचला उठून सहाला कामाला लागतो असा दावाही अजित पवार यांनी केला.