Dada Bhuse : सध्या राज्यात पुढचे मुख्यमंत्री अजित पवारचं(Ajit Pawar) या चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar) यांनी एका कार्यक्रमात अजित पवार मुख्यमंत्री असा उल्लेख केल्यानंतर भाजपेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनीही यावर थेटपणे भाष्य केलं आहे. अशातच आता शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांनी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? हे स्पष्टपणे सांगून टाकलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मुख्यमंत्रिपदाबाबतची चर्चा चांगलीच रंगली आहे.
‘माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर तुमच्या सह्या’; शरद पवारांनी अजितदादा गटाला ठणकावलं
उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पुढचं वक्तव्यही ऐका, सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असून निवडणूक एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली होणार आहे. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचं दादा भुसे यांनी स्पष्ट केलं आहे.
Sanjay Raut : .. तर अजितदादांचीही आमदारकी रद्द होईल! राऊतांचा खळबळजनक दावा
अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या त्यानंतर तत्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील 12 जिल्ह्यातील सुधारित पालकमंत्र्यांची घोषणा केली होती. त्यानंतर अजित पवार यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, सध्या मुख्यमंत्री बदलणार नाही, अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तेव्हा 5 वर्षांसाठी करु असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं.
चाहत्यांना खास सरप्राइज! Rangiley Funter सिनेमात अभिनेता हंसराज, रुपेश अन् यश झळकणार
नांदेडमध्ये नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी घटना घडल्यानंतर आम्ही तत्काळ आढावा घेतला आहे, काही वेळानंतरच रुग्णालयात प्रत्यक्ष भेट देण्यासाठी जाणार असून औषधे उपलब्धता पूर्ण आहे, ही रुटीन प्रोसेस आहे. हवा तेवढा निधी उपलब्ध असून निधीबाबत चर्चा झाली असल्याचंही दादा भुसे यांनी सांगितलं आहे.
Mera Piya Ghar Aaya Teaser Out: माधुरी दीक्षितच्या ‘मेरा पिया घर आया 2.0’ मध्ये झळकणार सनी लिओनी
नाशिक जिल्ह्याला अद्याप पालकमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे पालकमंत्रिपदाबाबतही त्यांनी यावेळी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, पालकमंत्रिबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेत असतात, हा निर्णय सर्वस्वी त्यांचाच असल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं आहे.
काही दिवसांवरच निवडणूका येऊन ठेपल्या असल्याने सर्वत्र निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली सुरु आहेत नाशिकमध्येही या हालचाली सुरु असून प्रत्येक पक्ष हा निवडणुकीसाठी तयारी करीत असतो, पक्ष कुठलाही असो तो त्याचं काम करीत असतो, आगमी निवडणुकीत महायुतीचे मिशन 45 पूर्ण करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.