Ajit Pawar Controversial Statement about Girl birth rate : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) हे देखील ठीक-ठिकाणी बैठका आणि सभा घेत आहेत. याच दरम्यान त्यांनी आजचा दिवस आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी ( Controversial Statement ) गाजवला. यामध्ये आता मुलींच्या जन्मदाराबाबत ( Girl birth rate ) त्याचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे.
काय म्हणाले अजित पवार?
मुलींच्या जन्मदराबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे भविष्यात मुलींची संख्या जर कमी असेल तर द्रौपदी सारखं करावं लागेल. असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. आज अजित पवार यांनी पत्नी आणि महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करताना डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.
‘कचा-कच बटना’वरुन नवा वाद; ‘अजित पवार व्यापारीच’ विरोधक बरसताच दादांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
अजित पवारांच्या या वक्तव्यावरून आता शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. तसा तसा अजित पवारांचा तोल सुटत आहे. मुलींचा जन्मदर घटला आहे. याची त्यांना काळजी वाटत नाही. ते त्यांची खिल्ली उडवत आहेत. यावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर कारवाई करणार का? असा सवाल देखील चव्हाण यांनी केला आहे.
‘पाहिजे तेवढा निधी…’ अजितदादांच्या वक्तव्यावर रोहित पवार म्हणाले, ‘हा आचारसंहितेचा भंग…’
दरम्यान त्या अगोदर निधी वाटपाबाबत आणि विरोधकांवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले होते की, पेशंटने जर आमच नाव घेतलं तर त्याला चांगली वागणूक द्या. मात्र, दुसरं काही नाव घेतलं तर त्याला असं इंजेक्शन टोचा की असं म्हणत सॉरी मला असं काही म्हणायच नाही असंही अजित पवार यावेळी म्हणाले.
तसेच लागेल तेवढा निधी देण्यासाठी आम्ही सहकार्य करू. पण जसा निधी हवा. तसेच आमच्यासाठी कचाकचा बटणंही दाबा. म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल. नाहीतर माझा हात आखडता येईल. असं वादग्रस्त वक्तव्य अजित पवार यांनी मतदार संघासाठी निधी देण्याबाबत केलं. ते इंदापूर तालुक्यात डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित करताना बोलत होते.