Ajit Pawar On Chandrashekhar Bavankule : राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच ओबीसी समाजाचं मारक आहे. नागपूरमध्ये त्यांनी जे ओबीसी समाजासाठी शिबीर घेतलं ती नौंटकी होती. अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली होती. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बावनकुळेंना सडेतोड उत्तर दिलं आहे. सत्ताधारी आमच्याबद्दल चांगले बोलतील ही अपेक्षाच नाही. आमच्याबद्दल टीकात्मक बोलणे हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला.
( Ajit Pawar Criticizes Chandrashekhar Bavankule )
Ajit Pawar : नगरच्या सभेतून चार जिल्हे ‘टार्गेट’वर; अजितदादांनी सांगितला राष्ट्रवादीचा प्लॅन
त्याचबरोबर पुढे ते असं देखील म्हणाले की, ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. त्यासाठी महाविकास आघाडीने सत्तेत असताना ओबीसी समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. यातून सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय सर्वांसमोर आहे. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यांना सत्तेत येऊन वर्ष व्हायला आले. तरी त्यांनी निवडणुका घेतलेल्या नाहीत.
Eknath khadse : माघारी फिरणार नाही! तावडेंची ऑफर धुडकावतं खडसेंनी कापले परतीचे दोर
शिंदे आणि भाजप यांच्याकडून मात्र दुसऱ्यांकडे बोटं दाखवली जात आहेत. एक बोट राष्ट्रवादीकडे करताना तीन बोटं त्यांच्याकडे आहेत. या गोष्टींचे तारतम्य त्यांना आहे का? असा सवाल अजित पवारांनी केला केला. तसेच आमची भूमिका स्पष्ट आहे, त्यानुसार आम्ही काम करतो. कोणत्याही निवडणुका नजरेसमोर ठेवून गोष्टी करण्याची आमची भूमिका नाही. असे स्पष्ट प्रतिपादन अजित पवार यांनी केलं.
अजितदादांचा वरिष्ठ नेत्यांना दम
दरम्यान सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha 2024 ) पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP ) बैठका सुरू आहेत. त्यामध्ये आज पुण्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या ( Sharad Pawar ) उपस्थितीमध्ये बैठक पार पडली यावेळी अजित पवार यांनी बोलताना पक्षातील नेत्यांना सज्जड दम दिला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे.लोकांची काम करण्यासाठी तुम्हाला पदं दिली आहे. मुळशीच्या लोकांना पदं दिली नाही म्हणून भांडयाचं नाही, नाही तर एकेकाच्या कानाखाली आवाज काढील बाकी काही नाही करायचो. याच्यातून तुमची नाही तर आमची बदनामी होते, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना दम भरला आहे.