Ajit Pawar : नगरच्या सभेतून चार जिल्हे ‘टार्गेट’वर; अजितदादांनी सांगितला राष्ट्रवादीचा प्लॅन

  • Written By: Published:
Ajit Pawar : नगरच्या सभेतून चार जिल्हे ‘टार्गेट’वर; अजितदादांनी सांगितला राष्ट्रवादीचा प्लॅन

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) २५ व्या वर्धापन दिनानिमित्त ९ जून रोजी अहमदनगर शहरात मोठी सभा होणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. या सभेतून राष्ट्रवादी मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दोनदा अहमदनगरला येत सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. या सभेच्या तयारीबाबत पुण्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बैठक घेतल्यानंतर अहमदनगरमध्येच का सभा घेण्यात येत आहे, याचे कारणही त्यांनी सांगून टाकले. (ncp leader ajit-pawar-on-ncp-meeting-ahmednagar and four district-plan)

अजित पवार म्हणाले, राष्ट्रवादीचा वर्धापनदिन १० जूनला आहे. त्या आधी अहमदनगरला ९ जून रोजी पक्षाची सभा आयोजित करण्यात आली आहे. या जिल्ह्याला लागून असलेल्या पुणे, बीड, नाशिक या जिल्ह्यांमधून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येतील, असे पवार यांनी स्पष्ट सांगितले. तसेच या जिल्ह्यांमध्ये पक्षाची मोठी ताकद आहे. आमदारांची संख्याही जास्त आहे. त्यामुळे नगरला मेळावा घेण्यात येत आहे. नऊ जूनला संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सभा होईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.


Odisha Train Accident अन् 288 मृत्यू टाळता आले असते? “मला पूर्वकल्पना होती,” बागेश्वर बाबांच्या दाव्याने खळबळ

अहमदनगरमधील केडगाव भागात ही सभा होत आहे. त्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. नगर जिल्ह्यात संग्राम जगताप, रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, किरण लहामटे, निलेश लंके हे पाच आमदार आहेत. आमदारांवर मेळाव्यासाठी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी हे आमदार गेल्या दोन दिवसांपासून जोरदार तयारीला लागले आहेत.

शिरसाटांनी सांगितला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त; ‘या’ तारखेच्या आत होणार मंत्री

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीसाठी बीड, अहमदनगर, नाशिकमधील लोकसभा जागा महत्त्वाच्या आहेत. त्यात अहमदनगर लोकसभा जागाही राष्ट्रवादीकडे आहे. गेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला ही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा खासदार सुजय विखे यांच्याविरोधात तगड्या उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची मानली जात आहे. या सभेतून नगरमध्ये लोकसभा निवडणुकीची रणशिंगही राष्ट्रवादीकडून फुंकले जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube