Ajit Pawar Future CM : राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा त्यांचे बॅनर हे चर्चेत आले आहे. धाराशिव या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे धाराशिव ही अजित पवार यांची सासरवाडी आहे. आणि आता या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बॅनर झळकल्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यात देखील अजित पवार यांचे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले होते.
अजित पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसेच अजित पवार हे भाजपसोबत जाणार अशा चर्चा देखील समोर आल्या होत्या. मात्र आपण कोठेही जाणार नसल्याचे खुद्द पवार यांनी स्पष्ट केले व या चर्चना पूर्णविराम दिला. मात्र दुसरीकडे खुद्द अजित दादांनी एका कार्यक्रमात जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे वारंवार अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख होणे यामुळे राज्यातील राजकारणात काहीतरी वेगळे सुरु असल्याच्या चर्चाना देखील उधाण आले आहे.
#WATCH | Poster appears in Dharashiv terming NCP leader Ajit Pawar as the future CM of Maharashtra. pic.twitter.com/m7dM3rXA6x
— ANI (@ANI) April 25, 2023
नेमकं काय लिहिले आहे बॅनरवर
आमदार अजित पवार यांची सासरवाडी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील तेर गावा मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील चौका चौकात तेरचे जावई ,आमचे नेते, जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अश्या आशयाचे बॅनर लावण्यात आलेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
मविआची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री, ठाकरे गटाने दिला राष्ट्रवादीला प्रस्ताव
हो मुख्यमंत्री होण्यास आवडेल
एका कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली होती. तसेच 2024च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकणार का? यावर पवार म्हणाले, 2024ला काय आताही मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकायला तयार आहे असं पवार म्हणाले होते.