Download App

रोहित पवारांचे शब्द खरे ठरले; योग्यवेळी पॉवर दाखवत अजितदादांनी मिळवले अर्थखाते

  • Written By: Last Updated:

maharashtra cabinet expansion:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार (Ajit Pawar) हे सत्तेत सहभागी झाले आहेत. सत्तेत सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतःकडे चांगले खाते घेतील. तसेच आपल्याबरोबर आलेल्या सहकाऱ्यांनाही चांगले खाते देतील अशी राजकीय चर्चा होती. ही चर्चा आता शंभर टक्के खरी ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आले आहे. एका अर्थाने अजित पवारांकडे सरकारच्या तिजोरीची चावी आलेली आहे. परंतु अजित पवारांबाबत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मध्यंतरी काही शब्द वापरले होते. ते शब्द खरे ठरले आहे. ajit-pawar get finance ministry rohit speak on ajit pawar few day)

शिंदे गटाला निधीसाठी पुन्हा अजित पवारांच्या टोलनाक्यावर यावं लागलं; यशोमती ठाकुरांनी डिवचलं

मला आश्चर्य वाटते. अजितदादा जेव्हा इथे होते, तेव्हा खातेवाटपाचा निर्णय देखील तात्काळ घेत होते. मविआतही कोणाला कोणते खाते मिळणार, हे तर आधीच ठरले होते. मात्र, भाजपची पद्धत वेगळी आहे. भापज आमदारांना मंत्रिपदासाठी झुलवते ठेवते. त्यामुळे दोन पक्षात भांडणे लागतील. जेवढी भांडणे जास्त तेवढा भाजपचा फायदाच आहे. मात्र, यामुळे राज्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष होते आहे. या सगळ्या गोंधळात सामान्य माणंसांचे प्रश्न बाजूला राहतात, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला होता.

खातेवाटपात शिंदे ठाम ? अजित पवार गटाची जबाबदारी भाजपचीच

त्याचबरोबर दादांचा स्वभाव कडक आहे. ते फरफटत जाणार नाही. योग्यवेळी योग्य ताकद दाखवतील. फक्त आमच्यासोबत राहून त्यांनी आपली ताकद दाखवली असती तर तर आम्हाला आनंद झाला असता असे रोहित पवार काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यातील दादांचा स्वभाव कडक आहे. ते फरफटत जाणार नाही, असे शब्द रोहित पवारांचे होते.

रोहित पवारांचे शब्द हे अजित पवारांनी खरेही करून दाखविले आहेत. राज्याचे महत्त्वाचे अर्थखातेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. अजित पवारांना हे खाते हवे होते. हे खाते देण्यास शिंदेंच्या आमदारांनी विरोध केला होता. त्याला जुने कारणेही देण्यात आले होते. हे खातेही मिळविण्यासाठी अजित पवार हे थेट गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेले होते. तेथे तोडगा निघून महत्त्वाचे अर्थखाते अजित पवारांकडे गेले आहेत. त्याचबरोबर सहकार, कृषी, महिला व बालकल्याण हे महत्त्वाचे मंत्रिपदेही आपल्याबरोबर आलेल्यांना मिळवून दिले आहे.

Tags

follow us