खातेवाटपात शिंदे ठाम ? अजित पवार गटाची जबाबदारी भाजपचीच

  • Written By: Published:
खातेवाटपात शिंदे ठाम ? अजित पवार गटाची जबाबदारी भाजपचीच

मुंबईः प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाला पहिल्या विस्तारात नऊ खाती मिळाली आहेत. पण कुठली खाती द्यावी, यावर दोन आठवडे खलबते सुरू होती. अजित पवार यांना अर्थखाते देऊ नये, अशी भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतली होती. हा वाद दिल्ली दरबारी गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले होते. अखेर भाजप नेते व गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर खातेवाटपबाबत चर्चा झाली. तरी देखील तीन दिवस खातेवाटप झाले नाही. आज अखेर नवीन मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. (cabinet-expansion-ajit-pawar-group-get-6-ministries-from-bjp)

राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या खात्यांमध्ये भाजपच्या सहा पॉवरफुल खात्यांचा समावेश आहे. तर शिवसेनेतील सतत वाद असलेली तीन खाती राष्ट्रवादीला देण्यात आलेली आहेत. यामध्ये भाजपकडील अर्थ, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास तसेच क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशी सहा मोठी खाती आहेत. तर शिवसेनेकडील कृषी, अन्न आणि औषध प्रशासन, मदत व पुनर्वसन ही तीन खाती देण्यात आली आहेत. यातील कृषी आणि अन्न औषध विभाग ही दोन खाती सतत आरोप आणि वादग्रस्त राहिली आहेत. हीच खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहेत.

मंत्रिपदाची सुत्रे हाती येताच दादांचा पाय खोलात? लवासा प्रकरणी उच्च न्यायालयात 21 जुलैला सुनावणी

खातेवाटप पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकनाथ शिंदे यांच्या गटाने कुठलीही तडजोड केली नाही. उलट भाजपला आपली महत्त्वाची खाती राष्ट्रवादीला द्यावी लागली आहे. भाजपची सहा पॉवरफुल खात्याबाबत भाजपने तडजोड केली आहे. भाजपचे सहा पावरफुल खाती काढून घेतली असली तरी भाजपच्या वाट्याला दुसरी खाती आली नाहीत.

अजितदादांचा ‘पॉवर’गेम; भाजपसह शिंदेंच्या शिलेदारांना बसला फटका

ज्या खात्यांचे शिवसेना-भाजपामध्ये यापूर्वी वाटप झाले होते. त्यात कुठेही बदल करण्यात आला नाही. भाजपमधील मंत्र्यांना खाती देण्यात आली. त्यांना भाजप किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खाती देण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे गृहनिर्माण खाते काढून घेण्यात आले असले तरी त्यानी आपले अत्यंत विश्वासू असलेले अतुल सावे यांच्याकडे सोपवले आहे.

अब्दुल सत्तारांना दणका! वजनदार ‘कृषी’ खातं काढलं; आता मिळालं ‘हे’ खातं

तर मुख्यमंत्री यांचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम हे खाते काढून त्यांचे अत्यंत विश्वासू असलेले दादा भुसे यांच्याकडे हे खाते त्यांनी सोपवले आहे. म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडील खात्याची ताकद कमी होऊ दिलेली नाही. पण भाजपने तडजोड करत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतलं खरं पण त्यांची जबाबदारी भाजपला घ्यावी लागली हे आताच्या खातेवाटपांवरून दिसते आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube