अजितदादांचा ‘पॉवर’गेम; भाजपसह शिंदेंच्या शिलेदारांना बसला फटका

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 14T171516.726

NCP MLA Portfolio Distribution :   खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन सातत्याने सुरु असलेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देण्यात आलं असून इतर महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहे. हे खातेवाटप करताना भाजप  व शिवसेना शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले आहे. याचे कारण शिंदे गटाच्या आमदारांनी अजितदादांना अर्थ खाते देऊ नये, याविषयी आग्रह धरला होता. त्यानंतरदेखील शिंदे गटाचा विरोध झुगारुन अजितदादांना अर्थ खाते देण्यात आले आहे. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली तर, तर भाजपकडून सहा खाती दिली गेली आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवारांच्या गटाला कृषी, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती देण्यात आली आहे. तर भाजपकडून अर्थ, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, क्रीडा, महिला आणि बालकल्याण ही खाती अजित पवारांच्या गटाला देण्यात आली आहे.

खातेवाटपाची यादी जाहीर; अर्थ खातं अजितदादांकडे, कोणतं खातं कोणाकडे? वाचा…

भाजपचे नेते अतुल सावे यांच्याकडे सहकार खाते होते. त्याऐवजी आता त्यांना गृहनिर्माण खाते देण्यात आले आहे. सहकार खाते आता दिलीप वळसे पाटलांना देण्यात आले आहे.  तसेच वैद्यकीय शिक्षण खाते हे गिरीश महाजन यांच्याकडे होते ते आता हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे. अर्थ खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे होते ते आता अजित पवारांकडे आले आहे.

तसेच शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना आधी अन्न व भेसळ खाते होते. आता त्यांना जलसंधारण खाते देण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषी खाते काढून त्यांना अल्पसंख्यांक खाते देण्यात आले
आहे. कृषी खाते धनंजय मुंडेंना देण्यात आले आहे.  भाजपचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे महिला व बालविकास खाते अदिती तटकरे यांना देण्यात आले. तसेच गिरीश महाजन यांच्याकडील क्रीडा खाते राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांना देण्यात आले आहे.

मंगलप्रभात लोढांना झटका; महिला बाल कल्याण खातं राष्ट्रवादीच्या अदिती तटकरेंकडे

दरम्यान, या खातेवाटपावरुन वजनदार खाती राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याचे दिसून आले आहे. अर्थ, कृषी, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अशी महत्वाची खाती राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. यावरुन शिंदे गटाला दणका बसल्याचे बोलले जात आहे. याचे कारण नुकताच अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना महत्वाची खाती देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिळालेली खाती पुढिलप्रमाणे : 

अजित पवार – अर्थ
धनंजय मुंडे – कृषी
दिलीप वळसे पाटील – सहकार
हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
छगन भुजबळ – अन्न नागरी पुरवठा
धर्मराव अत्राम – अन्न आणि औषध प्रशासन
अनिल भाईदास पाटील – क्रीडा
अदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube