शिंदे गटाकडील तीन तर भाजपकडील सहा वजनदार खाते अजित पवार गटाला, कोणाचं खातं कोणाला मिळालं?

शिंदे गटाकडील तीन तर भाजपकडील सहा वजनदार खाते अजित पवार गटाला, कोणाचं खातं कोणाला मिळालं?

मुंबई : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्र्वादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये झाल्यानंतर आज दोन आठवड्यांनी खातेवाटप झाले आहे. शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात महत्वाच्या खात्यावरून संघर्ष सुरू होता. त्यामुळं खातेवाटप होण्याला विलंब होत होता. मात्र, शिंदे-पवार-फडणवीस यांच्या बैठकीनंतर आज खातेवाटप जाहीर झाले. शिंदें गटाच्या विरोधानंतरही अजित पवारांना अर्थ खाते मिळालं. शिंदे गटाकडील एकूण तीन खाते, तर भाजपकडील सहा वजनदार खाते राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) मिळाली आहेत.  (cabinet expansion portfolio distribution for ncp from shivsena three and bjp six)

खातेवाटपामध्ये एकनाथ शिंदे गटाकडून अजित पवार गटाला तीन खाती गेली. त्यात अब्दुल सत्तार यांच्याकडील कृषी खाते हे राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते धनंजय पंडितराव मुंडे यांच्याकडे देण्यात आलं. सत्तार यांच्याकडील कृषी खाते जाणार अशी आधीपासूनच चर्चा होती. आणि आता खातेवाटप झाल्यानंतर त्यांच्याकडील हे खातं काढून घेण्यात आलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडील मदत आणि पुनर्वसन हे खाते अनिल पाटील यांनी मिळालं आहे. आणि शिंदे गटाच्या संजय राठोड यांच्याकडे असलेलं अन्न आणि औषध प्रशासन हे खातं आता पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळवणारे विदर्भातील धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांना मिळालं आहे.

‘चाणक्य अन् त्यांची कुटनीती कुटून बारीक करणार’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार 

तर भाजपकडून सहा खाती गेली राष्ट्रवादीला मिळाली आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील महत्वाचं असलेलं अर्थ खात्याची जबाबदारी ही अजित पवारांकडे सोपवण्यात आली. तर अतुल सावे यांच्याकडील सहकार खाते हे दिलीप वळसे-पाटलांकडे गेले. गिरीश महाजन यांच्याकडील वैद्यकीय शिक्षण खात्याचा कारभार आता हसन मियाँलाल मुश्रीफ यांच्याकडे गेला असून रविंद्र चव्हाण यांच्याकडील अन्न नागरी पुरवठा खाते हे छगन भुजबळ यांच्याकडे गेले.

गिरीश महाजन यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण हे खाते संजय बाबुराव बनसोडे यांच्यचाकडे तर अपेक्षेप्रमाणे मंगलप्रभात लोढा यांच्याकडील महिला आणि बालकल्याण हे खाते अदिती सुनील तटकरे यांनी मिळाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube