‘चाणक्य अन् त्यांची कुटनीती कुटून बारीक करणार’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर पलटवार
Uddhav Thackeray replies Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यातील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी जे केले त्याला बेईमानीशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही. त्यांनी माझ्या नव्हे तर भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. बेईमानी होते तेव्हा कुटनीती वापरावी लागते, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता खुद्द उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Cabinet Portfolio : मोठी बातमी! अर्थ, सहकारसह महत्वाची खाते दादांकडे, शिंदे गटाला झटका…
जनतेच्या खलबत्त्यात चाणक्य आणि त्यांची कुटनीती कुटून बारीक करायची आहे, असे ठाकरे म्हणाले. मातोश्री निवासस्थानाबोहर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, अर्धे उपमुख्यमंत्री बोलले राष्ट्रवादीबरोबर युती ही कुटनीती आहे. ही कुटनीती आपल्याला कुटून टाकायची आहे. जनतेचा खलबत्ता किती मोठा आहे हे अजून यांना कळालेलं नाही. चाणक्य खलबतं करतो तर, जनतेचा खलबत्ता असतो. त्या खलबत्त्यात चाणक्य आणि त्यांची कुटनीती कुटून बारीक करायची आहे, असा घणाघात ठाकरे यांनी केला.
लोक तुम्हाला कुटून खातील – राऊत
ठाणे जिल्ह्यात काल बाजूबाजूला दोन हास्यजत्रेचे शो पार पडले. फडणवीस म्हणतात आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो ही कुटनिती आहे म्हणजेच राजकारण आहे. मग आम्ही जे राष्ट्रवादीबरोबर गेलो ते काय होतं?. तुम्ही करता ती कुटनिती, विदुरनिती, चाणक्यनिती. मग, ज्यावेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येतात ते काय होतं?, याचं उत्तर फडणवीस यांनी राज्यातील जनतेला द्यावे. वैफल्यग्रस्त अवस्थेत चुकीची विधान करू नका तुमचं हसं होत आहे.
फडणवीस खोटं बोलताहेत, शिंदे-मिंधे खोटं बोलताहेत अजितदादांना अजून कंठ फुटायचा आहे. तेव्हा आम्ही बोलूच. पण, शिवसेना आणि महाराष्ट्राच्या बाबतीत ते अत्यंत खोटं बोलत आहेत. तुम्ही केली ती कुटनिती आणि शिवसेनेने केला तो विश्वासघात. खरं म्हणजे शिंदे आणि फडणवीस यांनी केलेला विश्वासघात महाराष्ट्रच्या काळजात आरपार घुसला आहे. तुमच्या या फालतु कुटनितीमुळे जनता तुम्हाला कुटून खाणार आहे. तुमच्यासारख्या बेईमान लोकांना दूर ठेवण्यासाठीच महाविकास आघाडी स्थापन केली ती सुद्धा कुटनितीच होती, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.