Download App

‘योगींना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी’; अजित पवार गटाची सडकून टीका

Amol Mitkari On Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पुण्यातील आळंदीत त्यांनी अमृत महोत्सवाला हजेरी लावली आहे. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधान केलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं असल्याचं योगी म्हणाले आहेत. त्यावरुन अजित पवार गटाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सडकून टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास कमी असून त्यांनी तो करावा, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.

राम मंदिरानंतर आता लक्ष्य पुण्येश्वराचे मंदिर! सुनील देवधरांचा पुणेकरांसाठी निश्चय

अमोल मिटकरी म्हणाले, योगी आदित्यनाथ यांचे विधान अत्यंत चुकीचे आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी हे कधीही स्वीकारू शकत नाही. राजमाता जिजाऊ याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शक गुरू होत्या. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे असल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास नसेल, त्यांनी तो करावा. योगी आदित्यनाथ यांनी गोविंददेव गिरी महाराजांबद्दल काय बोलावे, हा त्यांचा अधिकार आहे. पण खरे शिवचरित्र लोकांसमोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवरायांच्या गुरू फक्त आणि फक्त राजमाता जिजाऊ होत्या आणि आध्यात्मिक गुरू म्हणून संत तुकाराम यांनी कार्य केलं असल्याचं अमोल मिटकरींनी स्पष्ट केलं आहे.

पुणे हादरले ! दुकानमालकावर गोळ्या झाडल्या; नंतर सराफ व्यावसायिकाची रिक्षामध्येच आत्महत्या !

काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ?
समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरणी आहे, कारण या मातीत पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले असल्याचं योगी म्हणाले होते.

https://www.youtube.com/watch?v=uzlBFq-Ex6I%E0%A5%8B

दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या या विधानानंतर राज्यात विरोधकांकडून त्यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे. योगींच्या या विधानावरुन शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वामागे राजमाता जिजाऊ यांचा हात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे कर्तुत्व राजमाता जिजाऊंचे आहे. हे कर्तुत्व दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण संबंध जगाला इतिहास माहीत आहे असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

follow us