Download App

‘महिला आरक्षण अनेकदा आणलं, पण यशस्वी झालं नाही’: प्रफुल्ल पटेलांची शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका…

Prafulla Patel On Sharad Pawar : संसदेत अनेकदा महिला आरक्षण विधेयक आणलं गेलं पण ते यशस्वी झालं नसल्याची टीका अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी केली आहे. दरम्यान, एका कार्यक्रमादरम्यान बोलताना प्रफुल्ल पटेल(Prafulla Patel) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, हँगिग गार्डन सात वर्षांसाठी होणार बंद

प्रफुल्ल पटेल म्हणाले, संसदेत 1996 ते 2008 पर्यंत अनेकदा महिला आरक्षण विधेयक आणण्यात आलं आहे. त्यावर अनेकदा चर्चा झाली आहे. मी संसदेत तिन्ही वेळा उपस्थित होतो, तेव्हा काही नेत्यांचं मत खाजगीत वेगळं आणि संसदेत वेगळं असल्याची टीकाही प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी बोलताना केली आहे.

Dipendra Singh Airee : ९ चेंडूत अर्धशतक करून युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला, नेपाळचा २३ वर्षीय दीपेंद्र सिंह ऐरी आहे तरी कोण?

तसेच अनेक लोकं महिला आरक्षण…महिला आरक्षण बोलत होते. पण त्यांच्याकडून यशस्वी झालं नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच महिला आरक्षण विधेयक यशस्वी झाल्याचं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचं कौतूक केलं आहे.

Sanjay Raut : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार? राऊतांनी सांगितलं कोण जिंकणार

संसदेच्या अधिवेशनादरम्यानच शरद पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेतील आणि कॅफेटेरियामधील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंवर राज्यात बरीच चर्चा झाली. बंडानंतरही पवार आणि पटेल यांच्यातील गोडवा कायम असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला होता. त्यावरुन शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावरुन मी चांगल्या भावनेतून फोटो शेअर केला असल्याचं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलं होतं.

केंद्रीय मंत्री मोठा की सचिव मोठा? कांदा प्रश्न बैठकीत उपस्थितांना पडला प्रश्न

संसदेच्या विशेष अधिवेशनात आधी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. त्यानूसार आता राज्यातील महिलांना विधानसभा लोकसभेत राजकीय आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या विधेयकावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

मतदारसंघाची पुर्नरचना आणि जनगणना आधी करावी, त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यात यावं असा पवित्रा विरोधकांकडून घेण्यात आला होता. मात्र, विरोधकांच्या मागणीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर देत हे महिला आरक्षण 2029 च्या निवडणुकीमध्ये लागू होणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावर मतदान करण्यापूर्वी सभागृहात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, खासदारांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. दोन्ही सभागृहातील 132 सदस्यांनी अतिशय अर्थपूर्ण चर्चा केली. भविष्यातही या चर्चेतील प्रत्येक शब्द आपल्या सर्वांच्या आगामी प्रवासात उपयोगी पडणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्त्रीशक्तीला विशेष मान मिळाला आहे. पंतप्रधान म्हणाले की हे वरचे सभागृह आहे. मतदानही एकमताने व्हायला हवे, असं आव्हानं त्यांनी केलं होतं.

Tags

follow us