Dipendra Singh Airee : ९ चेंडूत अर्धशतक करून युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला, नेपाळचा २३ वर्षीय दीपेंद्र सिंह ऐरी आहे तरी कोण?

  • Written By: Published:
Dipendra Singh Airee : ९ चेंडूत अर्धशतक करून युवराज सिंगचा रेकॉर्ड मोडला, नेपाळचा २३ वर्षीय दीपेंद्र सिंह ऐरी आहे तरी कोण?

Asian Games 2023 : आज आशियाई खेळ 2023 मध्ये नेपाळ आणि मंगोलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यात नेपाळ संघाने उत्तम कामगिरी दाखवली. आजही वनडे क्रिकेटमध्ये 300 धावा करणे ही मोठी गोष्ट मानली जाते. पण नेपाळने टी-20 क्रिकेटमध्येच 300 धावा केल्या. नेपाळने मंगोलियाविरुद्ध 20 षटकांत 3 गडी गमावून 314 धावा केल्या. कुशल मल्लाचे सर्वात वेगवान शतक (137*) आणि दीपेंद्र सिंह ऐरीच्या वेगवान अर्धशतकामुळे (52*) हे शक्य झालं. दीपेंद्रने 9 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दरम्यान, दीपेंद्र सिंह ऐरी (Dipendra Singh Airee) आहे तरी कोण? त्याने क्रिकेट खेळायला कधी सुरुवात केली, याचविषयी जाणून घेऊ.

नेपाळचा स्टार मिडल ऑर्डर बॅट्समन दीपेंद्र सिंहने युवराज सिंगचा टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकांचा विक्रम मोडीत काढला. युवराजने केवळ 12 चेंडूत अर्धशतक केले होते. मात्र दीपेंद्र सिंह ऐरीने केवळ 9 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दीपेंद्रने मंगोलियाच्या गोलंदाजाची जोरदार धलाई केली. दीपेंद्रचे ते 9 चेंडू असे होते- 6,6,6,6,6,6,2,6 आणि 6. त्याने 520 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 10 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. दीपेंद्र सिंह ऐरीची ही खेळी अनेक वर्ष क्रिकेटप्रेमींच्चा लक्षातं राहिल. अवघ्या 16 वर्षीय खेळाडून युवराज सिंहचा रेकॉर्ड ब्रेक केल्यानं क्रिकेट विश्वात सध्या त्याचीच चर्चा आहे.

Anupriya Patel : लग्नाच्या वाढदिवसाला निघाले, केंद्रीय मंत्र्यांच्या पतीचा अपघात 

दीपेंद्र सिंग ऐरी आहे तरी कोण?

दीपेंद्र सिंह ऐरी हा केवळ 23 वर्षांचा क्रिकेटपटू आहेत. त्याचा जन्म 24 जानेवारी 2000 रोजी गज्जर येथे झाला. दीपेंद्र हा 11 खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी 2018 मध्ये नेदरलँड विरुद्ध नेपाळसाठी पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. दीपेंद्र नेपाळकडून ODI आणि T20 या दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. ऐरी हा मधल्या फळीतील फलंदाज आहे जो त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. याशिवाय दीपेंद्र हा एक अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. त्याने अनेक अप्रतिम झेलही घेतले आहेत.

ऐरीने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी नेपाळकडून केनियाविरुद्ध पदार्पण केले. या स्टार खेळाडूने 2016 मध्ये नेपाळकडून अंडर-19 विश्वचषकही खेळला आहे. नेपाळच्या अनुभवी क्रिकेटपटूंमध्ये दीपेंद्र सिंग ऐरीची गणना होते. त्याने आतापर्यंत नेपाळसाठी 52 एकदिवसीय आणि 45 टी-20 सामने खेळले आहेत. वनडेमध्ये त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 889 धावा केल्या आहेत. तर T20 मध्ये, दीपेंद्रने 136 च्या स्ट्राइक रेटने 1155 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या खेळीनं 1 शतक आणि 6 अर्धशतकही ठोकले आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube