Download App

तुम्ही आरोपी म्हणून आत गेलात व जामीनावर बाहेर आलात; तटकरेंनी राऊतांना फटकारले !

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut VS Sunil Tatkare: अजित पवार हे सत्तेत सहभागी होऊन शंभर दिवसांचा कालावधी झाला आहे. याबाबत अजित पवार (Ajit Pawar) यांनी जनतेला एक खुले पत्र लिहिले आहे. त्यावर अजित पवार व त्यांच्या गटावर शरद पवार गटाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. तर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना आग्रलेखात अजित पवारांबद्दल लिहिले आहे. त्यावरून अजित पवार गट खवळला आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी संजय राऊत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत तुम्ही जेलमध्ये गेला होता, अशी आठवण तटकरे यांनी राऊतांना करून दिली आहे.

राज ठाकरे-मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकी काय ठरले ? ठाकरेंची उद्या दहाची ‘डेडलाइन’

सुनील तटकरे म्हणाले, आम्ही घेतलेल्या भूमिकेवरसुध्दा टिकाटिप्पणी करण्याचा पत्रकार म्हणून तुम्हाला अधिकार आहे. पण लिखाणात सुसंस्कृतपणा असावा, कालपर्यंत अजितदादांसारखे नेतृत्व असू शकत नाही असे म्हणणार्‍या संजय राऊतांनी शंभर दिवस झाल्यानंतर अशा प्रकारची टिका टिप्पणी करणे योग्य नाही, असे स्पष्ट सांगतानाच यापेक्षा अधिक तुम्ही आमच्याशी बोलला आहात आज त्यावर भाष्य करायचे नाही असा दावाही सुनील तटकरे यांनी केला.

Ram Kadam new look : नवीन हेअरस्टाईलमुळे आमदार कदम चर्चेत | LetsUpp Marathi

संजय राऊत, तुम्ही टीका टिप्पणी जरूर करा पण तुम्ही सिंचन घोटाळ्यातील आरोपी, असा आमचा उल्लेख करता. मात्र कुठल्याही तपास यंत्रणांच्या तपासात अजितदादा किंवा मला आरोपी केले गेले नाही. उलट संजय राऊत तुम्ही आरोपी आहेत. आरोपी म्हणून आत गेलात व जामीनावर बाहेर आलात. त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही असेही सुनील तटकरे यांनी खडसावले.

संजय राऊत यांनी नाकाने कांदे सोलण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चालले आहे हे आधी पहावे. सभ्य भाषेत टीका करता. पातळी सोडून टीका करू नका. संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षातंर्गत काय शब्दप्रयोग करावेत किंवा करू नयेत याबद्दल मला बोलायचे नाही परंतु आमच्या पक्षाच्या किंवा अजितदादा पवार यांच्याबद्दल टिका करताना संस्कृती ठेवून करावी, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार उत्तम पध्दतीने काम करत होते. त्या अजितदादांचा उल्लेख अलीकडे संजय राऊत हे सिंचनदादा म्हणून करत आहेत. अनेक वेळा संजय राऊत अजितदादांच्या निर्णयामुळे, त्यांच्या प्रशासन कौशल्यामुळे कसे प्रभावीत असल्याचे माझ्याजवळ बोलायचे, याची आठवणही तटकरेंनी राऊतांना काढून दिली आहे.

Tags

follow us