Download App

‘बॅनर लावून मंत्री अन् मुख्यमंत्री होत नाही’; अनिल पाटलांनी बॅनरबाजीवरुन रोहित पवारांना घेरलं…

Anil Patil On Rohit Pawar : “बॅनर लावून मंत्री अन् मुख्यमंत्री होत नाही, मुख्यमंत्री होण्यासाठी 148 चा आकडा गाठावा लागतो”, अशी टोलेबाजी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील(Anil Patil) यांनी केली आहे. राज्यात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ अशी बॅनरबाजी करण्यात आली. त्यावरुन अनिल पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. अनिल पाटील यांनी आज जळगावातून माध्यमांशी संवाद साधला.

बावनकुळेंची चहापानाच्या वक्तव्यावरून सारवासारव; म्हणाले, ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास…’

अनिल पाटील म्हणाले , बॅनर लावून मुख्यमंत्री आणि मंत्री होत नाही, मंत्री किंवा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 148 चा आकडा गाठावा लागतो. बॅनर लावून मुख्यमंत्री होता येत नाही, असा टोला अनिल पाटलांनी लगावला आहे. यावेळी बोलताना अनिल पाटील यांनी इतर मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा, 19 कोटींची मालमत्ता जप्त

राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारच :
सध्या राज्यात अजित पवार गटाच्या विधानसभेतील आमदारांचा अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे कारवाई सुरू आहे, अशातच आता नागालँडमध्ये देखील शेड्युल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची मागणी शरद पवार गटाने केली. त्यावर अनिल पाटील म्हणाले, अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष, त्यामुळे कारवाईची चिंता करू नका, अजितदादा जे ठरवतील त्यानुसार कारवाईला सामोरे जावे लागेल, असे म्हणत मंत्री अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाला आव्हान दिलं आहे.

किसान पुत्राची कमाल! पेरणी केल्यावर पिकांना दोन महिने पाण्याची गरज लागणार नाही?; कृषिमंत्र्यांकडून संशोधनाची दखल

नागालॅंडमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा जाहीर केला. हे आमदार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून तीन दिवसीय दौऱ्यात ते अजित पवारांची भेट घेणार आहेत. नागालँडचे आमदार मुंबई दौऱ्यावर असताना आमदारांविरोधात शरद पवार गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली. नागालँडचे विधानसभा अध्यक्ष यांना शरद पवार गटाने काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले. या पत्रात सत्तेत सहभागी सात आमदारांनी अजित पवार गटासोबत जाऊन पक्षविरोधी कृती केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, रोहित पवार हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत, रोहित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. पुणे द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर लागलेले बॅनर सध्या चर्चेत आहेत. या बॅनरबाजीवरुन भाजप नेत्यांसह अजित पवार गटाच्या नेत्यांकडून रोहित पवारांवर सडकून टीका केली जात आहे. या टीकेवर रोहित पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

Tags

follow us