Download App

शरद पवार गटात प्रवेशाच्या अफवा पण लंकेंच्या चेहऱ्यावर भलतंच टेन्शन!

अमोल भिंगारदिवे

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) रणधुमाळीला वेग आलेला असतानाच राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर निलेश लंके यांनीच या चर्चेला पूर्णविराम देत शरद पवार यांची भेट नाही या अफवा असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांच्याकडूनही निलेश लंके यांच्या प्रवेशाबाबत अद्याप काहीच स्पष्ट करण्यात आलं नाही. त्यामुळे तुर्तास तरी निलेश लंके अजित पवार गटातच असणार, असं दिसतंय. दुसरी विशेष बाब म्हणजे निलेश लंके माध्यमांसमोर बोलत असताना शरद पवारांच्या भेटीवर सवाल जवाब करताना भलत्याच टेन्शनमध्ये दिसून आले आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकारणातही आता वेगळीच चर्चा रंगू लागली आहे.

Oscars 2024: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिग्गज स्टार्ससोबत बसलेला ‘तो’ श्वान नेमका कोण?

निलेश लंके मागील दीड वर्षांपासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी जोरदार तयारी करत असल्याचं काही लपून राहिलेलं नाही. निलेश लंके यांनी नगरच्या दक्षिण भागात आपला जनसंपर्क वाढवत कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अशातच नगर शहरात लंके यांनी नूकताच छत्रपती संभाजीराजे महानाट्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. निलेश लंके लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच तयारी करत असल्याचं यावेळी प्रत्येकाच्या ओठावर होतं. या कार्यक्रमाला शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांना शरद पवार गटात येण्याबाबत खुलं आवाहन केलं होतं. कोल्हेंनी आवाहन करताच निलेश लंकेंबाबत पक्ष प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.

चर्चेला निलेश लंकेंचा पूर्णविराम!
खासदार अमोल कोल्हे शिरुरला आले असता त्यांनी भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर शहरात घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज कार्यक्रमाबाबत कोल्हे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेत शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, शरद पवार यांचीही भेट झालेली नाही. नगर दक्षिणमधून खासदारकी लढवण्याबद्दल अजून माझी तयारी झालेली नाही किंवा मी लढवणार नाही. क्षणाक्षणाला राजकारण बदलत असतं त्यामुळे त्या-त्या वेळेस तो निर्णय घेतली जातील, असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलं आहे.

निवडणुकी आधी मी शांत बसाव म्हणून ईडीची नोटीस; जप्तीच्या कारवाईनंतर रोहित पवार आक्रमक

निलेश लंके यांचा काल वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त लावण्यात बॅनरवर शरद पवार यांचे फोटो झळकावण्यात आले होता. अमोल कोल्हेंचं आवाहन अन् बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आल्याने निलेश लंके शरद पवारांचा हात धरणार हे स्पष्ट दिसून येत होतं. तर दुसऱ्या दिवशी ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. मात्र, या भेटीबाबत बोलताना निलेश लंके यांनी भेटीची अफवा असल्याचं सांगितलं खरं पण चेहऱ्यावर असलेलं टेन्शनही लंके लपवू शकले नाहीत.

दरम्यान, निलेश लंके यांच्या प्रवेशाच्या चर्चेंना राज्याच्या राजकारण मोठी खळबळ उडाली होती. या चर्चेवर अजित पवार गटाच्या आमदारांकडून प्रतिक्रिया देण्यात आल्या. निलेश लंके हे अजित पवार यांची साथ सोडणार नाहीत, ते अजित पवार गटात जाणार नसल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी ठामपणे सांगितलं. तर धर्माराव बाबा आत्राम यांनी निलेश लंके यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर त्यांच्यावर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. निलेश लंके अजित पवार गटात आहेत, त्यांनी सर्व कामे करुन घेतील आता ते गेले तरीही काहीही फरक पडणार नसल्याची टीका आत्राम यांनी केली आहे.

follow us