Download App

नाशिक पदवीधरबाबत अजित पवारांनी कॉंग्रेसला दिला होता ‘हा’ सल्ला

पुणे : ‘नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. पण त्यांनी अर्ज भरला नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. सत्यजितचा अर्ज आला. यामागील कारणं स्वतः डॉक्टर चांगले सांगू शकतील. ते 3 टर्मला पदवीधर आमदार होते. त्यामुळे त्यांनी फॉर्म भरायला पाहिजे होता. पण घरात त्यांची चर्चा झाली असेल आणि सत्यजितचा अर्ज आला. मला याची आधिच कुणकुण लागल्याने मी ही गोष्ट कॉंग्रेसच्या विरिष्ठांच्या लक्षात आणून दिली होती. मी असंही सांगितलं होत तुम्ही एक अधिकृत डमी फॉर्म भरून ठेवा.’ राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

या अगोदर देखील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्यजित तांबेंच्या बंडखोरीबाबत आपण बाळासाहेब थोरातांना कल्पना दिल्याचं म्हटलं होत. तर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी ‘मला याची आधिच कुणकुण लागल्याने मी ही गोष्ट कॉंग्रेसच्या विरिष्ठांच्या लक्षात आणून दिली होती. मी असंही सांगितलं होत तुम्ही एक अधिकृत डमी फॉर्म भरून ठेवा.’ असा सल्ला कॉंग्रेसला दिला होता असं म्हटलं आहे.

दरम्यान आता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या शुंभागी पाटील यांनी अखेर तीन वाजेपर्यंत आपला अर्ज मागे घेतलाच नाही.

मात्र भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. या मतदारसंघात भाजपने आपला अधिकृत उमेदवार तर दिलाच नाही, तर भाजप समर्थकांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे भाजपकडून तांबेसाठी मैदान मोकळे झाले आहे.

यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे, शुभांगी पाटील व सुभाष जंगले यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. इतरही अपक्ष उमेदवार असले तरी या तीन उमेदवारांमध्येच लढत होणार आहे.

Tags

follow us